TET Exam 2024 saam tv
महाराष्ट्र

TET Exam 2024: शिक्षक होणार्‍यांसाठी महत्त्वाची बातमी, टीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; कधीपासून परीक्षा?

Maharashtra Teacher Eligibility Test 2024: शिक्षक होण्यासाठी टीईटी परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ही परीक्षा कधीपासून असणार आहे हे घ्या जाणून...

Priya More

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 (Maharashtra Teacher Eligibility Test 2024)म्हणजेच टीईटीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही परीक्षा पुढच्या महिन्यात १० नोव्हेंबर रोजी घेतली जाणार आहे. परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवाराला ३० सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे.

पहिली ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळ, सर्व माध्यम अनुदानित, विनाअनुदानित, कायम विना अनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमत: ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. शिक्षक होण्यासाठी इच्छुक उमेदवारांना आता ही परीक्षा द्यावी लागणार आहे. राज्य परीक्षा परिषदेकडून १० नोव्हेंबरला ही परीक्षा घेतली जाणार आहे.

या परीक्षेशी संबंधीत शासननिर्णय, अनुषगिक माहिती, सुचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in वेबसाइटवर उपलब्ध आहे. शिक्षक पात्रता परिक्षेसाठी उमेदवारांना ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज भरता येणार असून प्रवेशपत्राची २८ ऑक्टोंबर ते १० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन प्रिंन्ट काढता येणार आहे.

या परिक्षेचा पहिला पेपर १० नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० ते १ वाजेपर्यंत होणार आहे. तर दुसरा पेपर दुपारी २ ते ४.३० वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणेचे उपायुक्त संजय राठोड यांनी ही माहिती दिली. या परीक्षेसाठी अर्ज भरताना खोटी माहिती भरणाऱ्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे अर्ज करताना उमेदवारांनी काळजी घेणं गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Facial: पार्लरला जाऊन न जाता घरच्याघरी फेशियल कसं करायचं? लिंबू, मधाच्या फेस पॅकने मिळवा ग्लोइंग स्कीन

Maharashtra Nagar Parishad Live : सांगलीत पोलीस व भाजप कार्यकर्त्यांमध्ये वादावादी

निवडणुकांमध्ये पैशांचा आणि हेलिकॉप्टरचा वापर होतोय; सुप्रिया सुळे संतापल्या, निवडणुका रद्द करण्याची मागणी|VIDEO

How To Clean Gas Burner: गॅसवरचा बर्नर कसा स्वच्छ करायचा?

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस २०२९ नंतर केंद्रात जाणार? मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT