Koyta Gang Saam TV
महाराष्ट्र

Koyta Gang: कोयता गँगची दहशत अद्याप कायम; अहमदनगर पुणे महामार्गावर पान शॉप चालकास बेदम मारहाण

सातत्याने या गँगचे नवीन चेहरे समोर येत आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Koyta Gang: कोयता गँगने पुण्यात मोठा धुमाकूळ घातला आहे. अशात यातील काही नराधमांना पोलिसांनी अटक केली. तर काहींची बाजार परिसरात धिंड काढण्यात आली. ही कोयता गँग जेरबंद होईल तितकी कमीच आहे. कारण सातत्याने या गँगचे नवीन चेहरे समोर येत आहेत. त्यामुळे नागरिक आपला जीव मुठीत घेऊन जगत आहेत. (Latest Koyta Gang)

अहमदनगर- पुणे महामार्गावर असणाऱ्या सुपा या गावात किरकोळ कारणातून एका पान शॉप चालकास एका टोळक्याने कोयत्याने आणि लाकडी दंडक्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात पान शॉप चालक समीर जब्बार सय्यद आणि साजीद शेख हे दोघे गंभीर जखमी झालेत.

साजीद शेख याच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात कैफ मण्यार यांच्यासह अनोळखी पाच सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून अहमदनगर शहरात पुन्हा एकदा कोयता गँगचा उदय झाला आहे का? असा सवाल आता समोर येऊ लागला आहे.

कोयता गँगचा सुरू असलेला हैदोस लक्षात घेता यावर उपाय करण्यासाठी पोलिसांनी कोयता खरेदी करताना डॉक्यूमेंट जमा करणे बंधनकारक केले. कोयता खरेदी करण्यासाठी प्रत्येकाला आधार कार्ड द्यावं लागणार आहे. मात्र याचा या कोयता गँगवर काहीच परिणाम झालेला दिसत नाही.

अहमदनगर शहरातही काही दिवसांपूर्वी दोन गटात झालेल्या वादावादीमध्ये कोयत्याचा वापर झाला होता आता पुन्हा सुपा येथे किरकोळ कारणावरून पान शॉप चालकास कोयत्याने मारहाण झाल्याने खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : रखडेलेली सर्व कामे पूर्ण होणार, कामगारांची होणार चांदीच चांदी; वाचा आजचे राशीभविष्य

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

SCROLL FOR NEXT