Accident: पुणे-नगर महामार्गावर भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू Saam Tv
महाराष्ट्र

Accident: पुणे-नगर महामार्गावर भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू

शिक्रापूर ता. शिरूर येथील २४वा मैल येथे पुणे नगर महामार्गावर भीषण अपघात झाला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अहमदनगर: शिक्रापूर (Shikrapur) ता. शिरूर येथील २४वा मैल येथे पुणे (Pune) नगर (Ahmednagar) महामार्गावर भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातामध्ये ३ वाहनांचा विचित्र अपघातात ४ जणांनाचा मृत्यू झाला आहे .तर २ जण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. या जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयामध्ये (hospital) उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. (Terrible accident on Pune Nagar highway)

हे देखील पहा-

पुणे (Pune)- नगर महामार्गावर शिक्रापूर (Shikrapur) येथील २४ वा मैल इथे भीषण अपघात (Accident) झाला आहे. ट्रकने कार आणि २ टू व्हीलर गाड्यांना जोरदार धडक दिली आहे. हा भीषण अपघात घडला आहे. ट्रक पुण्याकडून नगरच्या दिशेला जात होता. तर फोर व्हीलर वाहन आणि २ टू व्हीलर नगरकडून पुण्याच्या दिशेने चाले होते. ट्रक डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेने जाऊन कार आणि २ बाईकला धडकला आहे. या भीषण अपघाताची माहिती तातडीने पोलिसांना (Police) देण्यात आली आहे.

अपघातामध्ये बाईकवर विठ्ठल हिंगाडे आणि रेश्मा हिंगाडे या पती- पत्नी दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर कार मधील लिना निकसे यांचा ही जागीच मृत्यू झाला आहे. मृता मधील एकाचे नाव अद्याप समजू शकले नसून जखमींची ही ओळख पटवण्याचे काम पोलीस (Police) करत आहेत. अधिक तपास शिक्रापूर पोलिस करत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : काँग्रेसच्या आंदोलनावर किरेन रिजिजू यांची टीका; म्हणाले, ‘काँग्रेस दिशाहीन’

Red Saree Designs For Women: महिलांसाठी लाल साड्यांच्या सुंदर डिझाईन्स, 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update: MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! आणखी एका आरोपीला अटक; आतापर्यंत १२ जणांना अटक

Hotel Safety Tips: हॉटेलमध्ये चेक-इन केल्यावर काय काय तपासून घ्यावे? 5 महत्वाच्या गोष्टी

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप; काँग्रेसच्या आंदोलनावरही घेतली शंका

SCROLL FOR NEXT