Jalna Accident News Saam Tv
महाराष्ट्र

Accident : ट्रक-ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; १० प्रवाशी जखमी

हा अपघात आज सकाळी ५ च्या सुमारास बदनापूर शहरातील औरंगाबाद -जालना महामार्गावर घडला आहे.

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना - पुण्याहून (Pune) रिसोड कडे प्रवाशी घेऊन जाणाऱ्या बाळाजी ट्रॅव्हल्सच्या बस आणि मालवाहू ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात (Accident)आज सकाळी ५ च्या सुमारास बदनापूर शहरातील औरंगाबाद -जालना महामार्गावर घडला आहे. ट्रॅव्हल्स बस ट्रकला ओव्हरटेक करताना हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. (Jalna Accident News)

बस ट्रकला घासत दुभाजकावर उलटल्याने हा अपघात झाल्याची महिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या अपघातात एक प्रवाशी गंभीर झाला असून १० प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहे. जखमींना रुग्णलायत दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. बदनापूर येथील ग्रामीण रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहे.

या अपघातांना नंतर जालना-औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करत वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात आली आहे. निष्काळजी वाहन चालवल्या प्रकरणी ट्रॅव्हल्स चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohtang Accident : भरधाव कार दरीत कोसळली; ४ जणांचा जागीच मृत्यू, वाहनाचा अक्षरश: चक्काचूर

Maharashtra Live News Update: प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगडावर भक्तांनी घेतले विठुरायाचे दर्शन

Pune : पुण्यात कोयता, हातोड्याने मारहाण; कॉलेजमध्ये झाला राडा! हाणामारीचे Video Viral

Shahapur : अखेर चौथ्या दिवशी सापडला युवकाचा मृतदेह; भारंगी नदीत बुडून झाला मृत्यू

Skin Care: सतत खोट्या आयलॅशेस लावण्याने होतील हे नुकसान, वेळीच व्हा सावधान

SCROLL FOR NEXT