धुळ्यात एसटी बस व ट्रकचा भीषण अपघात; अपघातात एसटी बस चालकाचा जागीच मृत्यू भूषण अहिरे
महाराष्ट्र

धुळ्यात एसटी बस व ट्रकचा भीषण अपघात; अपघातात एसटी बस चालकाचा जागीच मृत्यू

चाळीसगाव चौफुली येथून धुळे शहराच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसला मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिकहुन इंदोरच्या दिशेने माल वाहतूक करणार्‍या ट्रकने जोरदार धडक दिली.

भूषण अहिरे

धुळे: चाळीसगाव चौफुली येथे एसटी बस व ट्रकचा सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान अपघात झाला. या अपघातामध्ये बस चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर चार ते पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. (Terrible accident of ST bus and truck in Dhule; ST bus driver dies on the spot in accident)

हे देखील पहा -

निमगूळहुन धुळ्याकडे येणाऱ्या एसटी बसला सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. चाळीसगाव चौफुली येथून धुळे शहराच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसला मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिकहुन इंदोरच्या दिशेने माल वाहतूक करणार्‍या ट्रकने जोरदार धडक दिली. त्यानंतर वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत पोलला जाऊन धडकला. अपघाताची माहिती मिळताच चाळीसगाव रोड पोलीस तसेच महामार्ग पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. व जखमींना तात्काळ शासकीय रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai: पांडवकडा धबधब्यात दोन तरुण गेले वाहून; शोधकार्य सुरू

BJP Parliamentary Board: भाजपमध्ये भाकरी फिरणार; संसदीय मंडळात होणार लवकरच फेरबदल?

Morning tea: चहा पिण्यापूर्वी ही 1 सोपी गोष्ट करा; अॅसिडिटी किंवा जळजळीचा त्रास होणार नाही

Maharashtra News Live Update: इंगळून घाटात दरड कोसळली; एकेरी वाहतूक सुरू, प्रशासन सतर्क

धावत्या ईव्ही बंद करणारं अॅप, वाहन चालकांना चिनी अॅपचा धसका

SCROLL FOR NEXT