दरड दुर्घटना पीडितांचे कंटेनर हाऊसमध्ये तात्पुरते पुनर्वसन राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

दरड दुर्घटनाग्रस्तांचे कंटेनर हाऊसमध्ये तात्पुरते पुनर्वसन

या कंटेनर हाऊसमध्ये स्वयंपाक घर, स्वछता गृह, फॅन, विजेची सुविधा देण्यात आली आहे. एका कुटूंबासाठी लागणारी सर्व सुविधा या कंटेनर हाऊस मध्ये करण्यात आलेली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड : 22 जुलै रोजी अतिवृष्टीने महाड तालुक्यातील तळीये येथील जलनी माता डोंगराचा मातीचा ढिगारा कोसळून 32 घरे गाढली गेली. या दुर्घटनेत 85 जणांचा मृत्यू झाला होता. तळीये गावातील 21 कुटूंब ही पूर्णतः बेघर झाली आहेत. या कुटूंबाच्या तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पावले उचलली असून हिरानंदानी याच्या मार्फ़त 24 अत्याधुनिक अशी कंटेनर हाऊस तयार करण्यात आली आहेत.

हे देखील पहा -

या कंटेनर हाऊस मध्ये स्वयंपाक घर, स्वछता गृह, फॅन, विजेची सुविधा करण्यात आली आहे. एका कुटूंबासाठी लागणारी सर्व सुविधा या कंटेनर हाऊस मध्ये करण्यात आलेली आहे. तळीये गावातच मोकळ्या जागेवर ही सुविधा करण्यात आली आहे.

तळीयेमध्ये सध्या 11 कंटेनर हाऊस बसविण्यात आले असून एकूण 24 हाऊस तयार केले जाणार आहेत. यामध्ये 21 कुटूंब राहणार असून उर्वरित तीन कंटेनर मध्ये ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी आणि पोस्ट ऑफिस बनविले जाणार आहे. अशी माहिती तळीये ग्रामपंचायतीचे उपसरपंच महेश म्हस्के यांनी दिली आहे. जिल्हा प्रशासनाकडून तात्पुरती निवाऱ्याची सुविधा करण्यात आली असल्याने 11 तारखे पर्यत 24 कंटेनर हाऊस उभारले जाणार असून बेघर झालेले कुटूंब वास्तव्य करणार आहेत, असे म्हस्के यांनी सांगितले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार पुणे जिल्ह्यात करणार दुष्काळ दौरा

LPG Price Today : सणासुदीआधी महागाईचा झटका! LPG सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT