Telangana’s Mancherial district accident site where a speeding truck hit a Bolero carrying Maharashtra labour saam tv
महाराष्ट्र

Telangana Accident: महाराष्ट्रातील मजुरांचा तेलंगानामध्ये भयंकर अपघात; तीन जणांचा जागीच मृत्यू, ११ गंभीर जखमी

Telangana Accident Maharashtra Laborer Killed: तेलंगणातील मंचेरियाल जिल्ह्यात एका भरधाव ट्रकने बोलेरोला धडक दिली. अपघातात महाराष्ट्रातील तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर ११ जण गंभीर जखमी झालेत.

Bharat Jadhav

  • तेलंगाणामधील मंचिरियल जिल्ह्यात भीषण रस्ता अपघात

  • महाराष्ट्रातील तीन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू

  • ११ मजूर गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरू

महाराष्ट्रातून तेलंगाणात जाणाऱ्या मजुरांच्या वाहनाचा अपघात झाला. या अपघातात तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर ११ जण गंभीर जखमी झालेत. मंचिरियल जिल्ह्यातील जयपूर मंडळातील इंदरम एक्स रोडजवळ ही दुर्घटना घडलीय. मजूर महाराष्ट्रातून तेलंगणातील करीमनगरला जात होते. त्यावेळी त्यांच्या चारचाकी वाहनाला ट्रकने धडक दिल्यानं हा अपघात घडला.

या अपघातात बोलेरो वाहनातील तीन मजुरांचा जागीच मृत्यू झालाय. तर इतर ११ जण गंभीररीत्या जखमी झालेत. जखमींची अवस्था गंभीर असल्याने त्यांच्यावर मंचिरियल सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. करीमनगरकडे निघालेल्या बोलेरो वाहन रस्त्याच्या कडेला थांबवत असताना ट्रकने धडक दिली. अपघातानंतर बोलेरो वाहन पूर्णपणे खराब झालीय.अपघात झाल्यानंतर ड्रायव्हराने फरार झालाय.

दरम्यान हे मजूर रोवणी कामासाठी तेलंगणातील करीमनगरला जात होते. तेलंगाणा पोलिसांनी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

धाराशिवमध्ये कारने ऊसतोड मजुरांना उडवलं

कळंब-लातूर रस्त्यावर एका भीषण 'हिट अँड रन'च्या घटनेने खळबळ उडाली. भरधाव कारने रस्त्याने पायी चालणाऱ्या ७ ऊसतोड मजुरांना धडक दिली. या भीषण अपघातात ४ मजुरांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर कारसह चालक घटनास्थळावरून पसार झालाय. मिळालेल्या माहितीनुसार कळंब तालुक्यातील मंगरूळ गावचे काही ऊसतोड मजूर शेतातून कळंब बाजाराच्या दिशेने पायी निघाले होते. यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव कारने मजुरांना उडवलं.

अपघातात जखमी झालेल्या ६ मजुरांना तातडीने अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी ४ जण अतिदक्षता विभागात असून त्यांची प्रकृती अत्यावस्थ असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हे सर्व मजूर आदिवासी पारधी समाजाचे असल्याची प्राथमिक माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत खळबळ! हायप्रोफाईल एरियात मॉडेलच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

IND T20 WC 2026: शनिवारी टी-२० वर्ल्डकपचा थरार! टीम इंडिया कोणासोबत करणार दोन हात, १५ शिलेदार कोणते, A टू Z माहिती एका क्लिकवर

Mumbai News: IIT बॉम्बेमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या, हॉस्टेलच्या इमारतीवरून मारली उडी

Video Viral: रिलसाठी काहीपण!!! धावत्या लोकलमध्ये लटकत तरूणीचा स्टंट, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

Maharashtra Live News Update: मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT