Latur News
Latur News Saam Tv
महाराष्ट्र

धाबे दणाणले! तहसिलदार लाचेच्या जाळ्यात अडकल्यानंतर वाळू घाटावर लवकरच १४४ कलम

दीपक क्षीरसागर

लातूर - मांजरा व तेरणा नदीपात्रातील काही ठराविक घाट महसूल विभागाच्या निशाण्यावर आले असून तालुक्यातील संवेदनाशील असलेल्या वाळू घाटावर १४४ कलम जमावबंदी आदेश लावण्याच्या महसूल विभागाने हलचाली सुरू केल्या आहेत. यामुळे वाळू माफीयाचे धाबे दणाणले असून वाळूमाफीयाचा बिमोड करण्यासाठी महसूल विभागाने आता अतिशय कठोर पावले उचलण्यास सुरवात केल्याचे दिसते.

हे देखील पाहा -

लातूर (Latur) जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातून मांजरा व तेरणा या दोन नद्या वाहतात, सध्या नदीपात्रात पाणी असल्याने बोटीद्वारे वाळूचा बेकायदा उपसा राजरोसपणे सुरू आहे. मोठ्या प्रमाणात वाळूचे साठे करून ठेवण्यात आले आहेत. याबाबत अनेकवेळा कारवाई करण्यासाठी महसूल विभागाला मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे बेकायदा वाळू उपसा व वाहतुकीला लगाम लावण्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी कठोर पावले उचलली आहेत.

वाळू उपशाच्या ठिकाणांचा शोध घेऊन तेथून कोणत्याही स्थितीत बेकायदा वाळू उपसा व वाहतुक होणार नाही यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. याबाबतची संपूर्ण जबाबदारी उपविभागीय आधिकारी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. महसूल विभागाची डागाळलेली प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मांजरा व तेरणा नदीपात्रातील संवेदनाशील वाळू घाटाची माहीती मागवण्यात आली असून लवकरच या ठिकाणी १४४ कलम लागू जमावबंदी आदेश लागू करण्याच्या हालचाली महसूल विभागाने सुरू केल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes Problem : डायबेटीजने त्रस्त महिलांनी हे फळ रोज खावे; रक्तातील साखर लगेचच कंट्रोलमध्ये येणार

Beed News: मोठी बातमी! निवडणुकीआधी बीडमध्ये सापडलं पैशाचं घबाड, कारमधून तब्बल १ कोटींची रोकड जप्त

Weather Forecast: विदर्भ तापला, मराठवाड्यात उष्णतेच्या झळा; सोमवारपासून पुन्हा कोसळणार पाऊस

Brazil Flood: ब्राझीलमध्ये विनाशकारी महापूर, हजारो घरे पाण्याखाली; आतापर्यंत ५७ जणांचा मृत्यू

Horoscope Today: कटकटी वाढतील, शत्रू त्रास देतील; या ४ राशींच्या लोकांना आज राहावं लागणार सावध, वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT