Jalna Crime News : गेल्या चार वर्षांपासून महिला शिक्षिकेला अश्लील हावभाव करून सह शिक्षकाकडून शारीरिक सुखाची मागणी केल्या जात असल्याचा प्रकार बदनापूर शहरात शिक्षिकेने केलेल्या तक्रारीनंतर समाेर आला आहे. महिलेच्या तक्रारीनंतर संबंधित शिक्षकावर बदनापूर पोलिस ठाण्यात विनयभंगचा गुन्हा दाखल झाला आहे. (Maharashtra News)
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार बदनापूर शहरातील एका हायस्कुलमध्ये शिक्षिका (teacher) असलेल्या महिलेस त्याच शाळेतील एक शिक्षक वारंवार अश्लील हावभाव करीत असे. तिच्याकडे त्याने शारिरीक सुखाच्या मागणी देखील केल्याचे तिने तक्रारीत म्हटलं आहे.
शाळेत एकटी असताना तिला ताे स्पर्श करत असे. गेल्या चार वर्षांपासून तिला मानसिक त्रास दिला जात हाेता. या त्रासातून मुक्त हाेण्यासाठी तिने जिल्हा महिला तक्रार निवारण समितीकडे धाव घेतली.
त्यानंतर महिला तक्रार निवारण समितीने हे प्रकरण बदनापूर तालुका महिला निवारण समितीकडे चौकशीसाठी पाठवले. तालुका तक्रार निवारण समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हा तक्रार निवारण समितीने शिक्षकाने महिला शिक्षिकेविरुद्ध असभ्य वर्तवणूक केल्याचे आढळून आल्याने महिला शिक्षकेला बदनापूर पोलिस ठाण्यात महिला अत्याचार अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची सूचना केली. (Tajya Batmya)
या महिला शिक्षकेने बदनापूर पोलिस ठाण्यात शिक्षका विरुद्ध लेखी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित सहशिक्षकावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहे. या घटनेने शिक्षण (education) क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.