Nagpur Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur : मोमीनपुरा परिसरात तलवार नाचविल्याप्रकरणी सहा युवकांना अटक

या सर्व युवकांना पाेलिसांनी शोधून अटक केली.

मंगेश मोहिते

Nagpur Crime News : शिवजयंतीच्या (shiv jayanti) दिवशी तलवार नाचविल्याचा व्हिडिओ व्हायरल (video viral) झाल्यानंतर पाेलिसांनी (police) त्याची दखल घेत सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या सर्व युवकांना (youth) पाेलिसांनी अटक (arrest) केल्याची माहिती विनायक गोलहे (पीआय, तहसील पोलीस स्टेशन, नागपूर) यांनी दिली.

शिवजयंतीच्या दिवशी नागपूरच्या पारडी परिसरातून एक रॅली काढण्यात आली होती. ही रॅली नागपूरच्या मोमीनपुरा परिसरातून जात असताना बाईकवरून जाणाऱ्या दोन युवकांनी हातात तलवारी घेऊन त्या तलवारी झळकविल्या होत्या.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाेलिसांपर्यंत पाेहचला. त्यानंतर पोलिसांनी मोमीनपुरा परिसरातील सीसीटीव्ही चेक करून सहा जणांवर गुन्हा दाखल केला. (Maharashtra News)

या सर्व युवकांना पाेलिसांनी शोधून अटक केली. महत्त्वाचा म्हणजे ही रॅली पारडी पासून निघून शहराच्या वेगवेगळ्या भागातून जात मोमीनपुरा भागातून जात असताना हा सगळा प्रकार घडला. या व्हिडिओची पूर्ण शहनिशा केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती विनायक गोलहे (पीआय, तहसील पोलीस स्टेशन, नागपूर) यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT