Beach Saam Tv News
महाराष्ट्र

Pune tourists: पुण्याहून फिरायला गेलेले ३ पर्यटक तारकर्ली समुद्रात बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Tarkarli beach accident news: तारकर्ली येथे पर्यटनासाठी आलेल्या २ युवकांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. तर, एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

Bhagyashree Kamble

तारकर्ली येथे पर्यटनासाठी आलेल्या २ तरूणांचा समुद्रात बुडून मृत्यू झालाय. तर, एका तरूणाची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पुण्यातील हडपसर येथून हे पर्यटक पर्यटनाला गेले होते. यादरम्यान समुद्रात ५ जण उतरले होते.

मात्र, पाण्याचा अंदाज न आल्यानं ३ तरूण बुडाले. बुडालेल्या युवकांना बचाव पथकाने बाहेर काढले. तातडीने तरूणांना रूग्णवाहिकेतून रूग्णालयात नेण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी २ तरूणांना मृत घोषित केलं.

ही धक्कादायक घटना २२ फेब्रुवारीला ११: २० वाजेच्या सुमारास तारकर्ली एमटीडीसी जवळील समुद्रकिनाऱ्यावर घडली आहे. पुणे हडपसर येथून तारकर्ली येथे पर्यटनासाठी एकूण ५ जण गेले होते. ५ जण समुद्रात उतरले होते. त्यातील ३ जण पाण्यात बुडाले. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे पोहत असलेल्या तरूणांपैकी ओंकार भोसले, शुभम सोनवणे आणि रोहित कोळी हे तरूण पाण्यात ओढले गेले.

तीन तरूण बुडत असल्याचं पाहताच स्थानिकांनी आणि पर्यटन व्यवसायिकांनी समुद्राच्या पाण्यात बचाव कार्य सुरू केलं. तीन जणांना बाहेर काढण्यात आले. रूग्णावाहिकेतून त्यांना तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी रोहित कोळी (२१), शुभम सुनील सोनवणे (२२) या तरूणांना मृत घोषित केले आहे. तर, ओंकार रामचंद्र भोसले (२३), याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.

ओंकार रामचंद्र भोसले याला जिल्हा रुग्णालय ऐवजी डॉ.अविनाश झाटये यांच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती ग्रामीण रुग्णालय मालवण यांनी दिली आहे. डॉ.अविनाश झाटये यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरूणाची ऑक्सिजन लेव्हल अद्याप वाढलेली नाही. त्यामुळे अद्यापही रुग्ण धोक्याच्या बाहेर आलेला नाही, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: गणरायाला मोदक का आवडतात? जाणून घ्या यामागची पौराणिक कथा

Maharashtra News Live Update: जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून अमोल कोल्हेंचा राज्य सरकारवर निशाणा

बुलढाणा जिल्हा बँकेत नवं समीकरण; अध्यक्षपदी डॉ.राजेंद्र शिंगणेंची निवड, ६५ वर्षांच्या इतिहासात शिंगणे कुटुंबाची ३१ वर्ष सत्ता

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला मिळणार रेल्वेची साथ; नव्या फ्रेट कॉरिडॉरचा मोठा प्लॅन!

SBI Recruitment: बँकेमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, SBI मध्ये २०७ पदांसाठी भरती; लाखो रुपये मिळवा पगार

SCROLL FOR NEXT