cm eknath shinde, health minister tanaji sawant, tuljapur,  saam tv
महाराष्ट्र

Tuljapur News : 'मुख्यमंत्री देतीलच, मी दहा लाख रुपये देताे' मंत्री तानाजी सावंतांनी पुसले द्राक्ष उत्पादक शेतकरी कुटुंबाचे अश्रु

शेतकरी सीताबाई सुरवसे यांनी घेतली मंत्री महाेद्यांची भेट.

Siddharth Latkar

- कैलास चाैधरी

Tanaji Sawant News : राज्यात अवकाळी पावसामुळे (unseasonal rains in maharashtra) बहुतांश जिल्ह्यात द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) हे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करीत आहेत. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली मदत येईलच त्यापुर्वी तुम्हांला दहा लाख रुपये मदत देताे असे आश्वासन आरोग्य मंत्री तानाजी सावंत (health minister tanaji sawant) यांनी मोरडा तालुक्यातील एका शेतकरी कुटुंबाला त्यांचे अश्रु पूसत दिले. (Maharashtra News)

तुळजापूर तालुक्यातील मोरडा येथील नुकसान ग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे आले होते. यावेळी शेतकरी सीताबाई सुरवसे (sitabai suravase) यांच्या वावरात मंत्री महाेद्य यांनी भेट दिली.

सीताबाई यांनी मोठ्या कष्टाने द्राक्ष बाग उभा केली होती. बँकेचे कर्ज, द्राक्षबागेला फवारणीसाठी लागणाऱ्या औषधांची दुकानदाराकडे केलेली उधारी हे द्राक्षाच्या उत्पन्नातून चुकती करायची होती. मात्र अचानक अवकाळी पावसाने द्राक्ष पिकांचे नुकसान झाले. अवकाळी वादळी वाऱ्यामुळे संपूर्ण द्राक्षबाग जमीनदोस्त झाली.

परिणामी सुरवसे कुटुंबीयांवर मोठे संकट आले. त्यामुळे सीताबाई यांना अश्रू अनावर होत होते. मुख्यमंत्र्यांच्या दाै-यात मंत्री सावंत यांनी तुम्हाला मुख्यमंत्री मदत करतीलच पण मी देखील दहा लाख रुपये देतो असं म्हणत सुरवसे कुटुंबीयांना आधार दिला. मंत्री तानाजी सावंत यांच्या मदतीच्या घोषणेमुळे सुरवसे कुटुंबीयांना माेठा आधार मिळाला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT