satara crime news, karad news, gutkha saam tv
महाराष्ट्र

Karad Crime News : पुणे बंगळूर महामार्गावर पाेलिसांची फिल्मी स्टाईल कारवाई; १६ लाखांचा गुटखा पकडला, दाेघे अटकेत

सहायक पोलिस निरीक्षक राहुल वरोटे यांच्या पथकाने मार्च महिन्यात १ कोटी १० लाख रुपयांचा गुटखा पकडला हाेता.

Siddharth Latkar

Karad News : तळबीड पाेलिसांनी पुणे आणि लातूर जिल्ह्यातील दाेघांना एनएच 4 वर सुमारे १६ लाखांच्या गुटखासह पकडले. पाेलिसांनी ही कारवाई वराडेनजीक केली असून तळबीड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडील वाहन देखील पाेलिसांनी जप्त केले आहे. (Maharashtra News)

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार एनएच 4 वर कर्नाटक येथून एक वाहन गुटख्याची वाहतूक करणार असल्याची माहिती पाेलिस दलास मिळाली. त्यानूसार तासवडे टोल नाका येथे पथकाने सापळा रचला. संबंधित वाहन येताच त्यास पाेलिसांच्या पथकाने (satara police) थांबण्याची सूचना वजा इशारा केला. मात्र वाहन चालकाने न थांबता पुणेच्या दिशेने वाहन नेले.

त्यानंतर पाेलिसांच्या पथकाने वाहनाचा पाठलाग केला. काही अंतरावर वाहन ताब्यात घेतले. या कारवाीत पाेलिसांनी 16 लाखांचा गुटखा व 8 लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण 25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

पाेलिसांनी या गुन्ह्यात विलास बलू जाधव (वय ४५, रा. निगडी, ता. पिंपरी चिंचवड, जि. पुणे. मूळ रा. सनमडी, ता. जत सांगली) व सचिन संजय रेड्डी (वय २०, रा. कुमठा, ता. औसा, जि. लातूर सध्या रा. सानेचीक सानेचेंबर बिल्डिंग चिखली, जि. पुणे) यांना अटक केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

SCROLL FOR NEXT