Tadoba-Andhari Tiger Reserve, Tadoba Online Booking saam tv
महाराष्ट्र

Tadoba Online Booking: ताडोबाला जाणार आहात? वाचा ऑनलाईन बुकिंगबाबत न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

Update on Online Tadoba Safari Booking : देशासह विदेशातील पर्यटकांना ताडाेबाचे आकर्षण आहे.

संजय तुमराम

Update on Online Tadoba-Andhari National Park oboking

ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला सफारी बुकिंगसाठी न्यायालयाने परवानगी दिल्याने पर्यटकांची हाेणारी गैरसोय आता टळणार आहे. यामुळे येत्या ४-५ दिवसात ताडोबाची अधिकृत बुकिंग साईट सुरु होण्याची शक्यता ताडोबा व्यवस्थापनाने व्यक्त केली आहे. (Maharashtra News)

या निर्णयामुळे ताडोबा व्यवस्थापनासह रिसॉर्ट मालक, टूर ऑपरेटर, जिप्सी चालक, गाईड आणि स्थानिक व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आगामी काळातील दिवाळी, नाताळ आणि नवीन वर्षाच्या बुकिंगचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

आर्थिक गैरव्यवहारामुळे वाईल्ड कनेक्टीव्हीटी सोल्युशन या बुकिंग करणाऱ्या एजन्सीसोबत ताडोबा व्यवस्थापनाने करार रद्द केला होता. मात्र २०२६ पर्यंत आपला करारनामा असताना ताडोबा व्यवस्थापनाने अचानक करार रद्द केल्याचे सांगत एजन्सीने चंद्रपूर न्यायालयात धाव घेतली होती.

न्यायालयाने यावर सुनावणी करत ताडोबाच्या बुकिंग प्रक्रियेला स्थगिती दिली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ताडोबाची बुकिंग प्रक्रिया ठप्प होती. मात्र आज (शुक्रवार) चंद्रपूर जिल्हा न्यायालयाने (chandrapur district court) ही स्थगिती उठवत ताडोबाला बुकिंगसाठी परवानगी दिली आहे अशी माहिती जितेंद्र रामगावकर (प्रकल्प संचालक, ताडोबा) यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

यामुळे येत्या ४-५ दिवसात ताडोबाची अधिकृत बुकिंग साईट सुरु होण्याची शक्यता ताडोबा व्यवस्थापनाने व्यक्त केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: टॅनिंग कमी करुन 3 दिवसात मिळवा ग्लोईंग फेस, वापरा 'हा' होममेड स्पेशल फेस मास्क

Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलच्या दरात बदल; वाचा मुंबई, पुणे ते नाशिक, नागपूरमधील भाव

Lockdown News : इराण युद्धामुळे भारतात लॉकडाऊन लागणार? व्हॉट्सॲपवरील 'तो' मेसेज किती खरा? वाचा

Maharashtra Live News Update: भोंदू अशोक खरातला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी

Ashok Kharat Case: मासा पाण्यातील वनस्पती! शाकाहारी लोकांना खायायला लावले मासे, खरातचा बंडलपणा आला समोर

SCROLL FOR NEXT