LokSabha Election 2024 Saam TV
महाराष्ट्र

LokSabha Election 2024 : शांतीगिरी महाराज पुन्हा लोकसभेच्या रिंगणात; नाशिकमध्ये स्वतः उमेदवारी केली जाहीर

Swami Shantigiriji Maharaj : जय बाबाजी भक्त परिवाराकडून नाशिकसह आणखी सहा मतदारसंघात देखील उमेदवार उभे केले जाणार आहेत, अशी माहिती समोर आलीये.

साम टिव्ही ब्युरो

सचिन बनसोडे

Nashik News :

स्वामी शांतीगिरी महाराजांच्या नेतृत्वात जय बाबाजी भक्त परिवाराने आगामी लोकसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. स्वतः शांतीगिरी महाराज नाशिक लोकसभा लढवणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. जय बाबाजी भक्त परिवाराकडून नाशिकसह आणखी सहा मतदारसंघात देखील उमेदवार उभे केले जाणार आहेत, अशी माहिती समोर आलीये.

महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली जय बाबाजी भक्त परिवारातील प्रमुख प्रचारकांची बैठक शिर्डी येथे संपन्न झाली. या बैठकीत "लढा राष्ट्रहिताचा, संकल्प शुद्ध राजकारणाचा " हा नारा घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला.

स्वतः शांतीगिरी महाराज नाशिक लोकसभा निवडणुक लढवणार असून यासह दिंडोरी, जळगाव, धुळे, छत्रपती संभाजी नगर, जालना आणि शिर्डी अशा सात मतदारसंघात उमेदवार उभे केले जाणार असल्याची घोषणा शांतीगिरी महाराजांनी केली आहे.

राज्यभरात जय बाबाजी भक्त परिवार मोठ्या संख्येने असून यापूर्वी शांतीगिरी महाराजांनी औरंगाबादमध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. आता मात्र त्यांनी नाशिक लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार केला असून राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी आपण उमेदवारी करत असल्याची प्रतिक्रिया शांतीगिरी महाराजांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT