buldhana saam tv
महाराष्ट्र

Buldhana: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चक्का जाम आंदाेलनास मध्यरात्रीच प्रारंभ

इयत्ता बारावीची परिक्षा (HSC Exam) असल्याने रास्ता राेकाे आंदाेलनात विद्यार्थ्यांना मुभा देत साेडले जात आहे.

संजय जाधव

बुलडाणा : राजु शेट्टींनी (raju shetti) राज्यभर चक्काजाम करण्याच्या आवाहनास बुलडाण्यात माेठा प्रतिसाद मिळाला आहे. बुलडाण्यात (buldhana) स्वाभिमानीचे (swabhimani shetkari sanghatana) विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांचे मध्यरात्री पासून शेकडो शेतकऱ्यांनासह रास्ता रोको आंदोलनाला प्रारंभ झाला आहे. महावितरण विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना मध्यरात्री पासुन टायर पेटवून शेगाव जळगाव मार्ग अडवला.

राजु शेट्टी यांनी १० दिवसांपासून चालु केलेल्या आंदोलनाची सरकारने दखल घेतली नसल्याने आंदोलनाला हिंसक वळण बुलडाण्यातील शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. चांगेफळ फाट्याजवळ शेकडो शेतकरी रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. इयत्ता बारावीची परिक्षा (HSC Exam) असल्याने रास्ता राेकाे आंदाेलनात विद्यार्थ्यांना मुभा देत साेडले जात आहे.

राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला दिवसा १० तास वीज द्या अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. राजु शेट्टी यांच्या मागण्या संदर्भात सरकारने निर्णायक भुमिका घ्यावी, अन्यथा राज्यात अधिक तिव्र चक्का जाम करणार असल्याचा इशारा प्रशांत डिक्कर यांनी दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मूलभूत सुविधांसाठी बुलढाण्यात आदिवासींचा एल्गार

६ ते १० ऑक्टोबरदरम्यान पाऊस अन् बर्फवृष्टीचा इशारा; महाराष्ट्रासह अनेक राज्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

Matheran : गाड्यांचा हॉर्न नाही, फक्त निसर्गाची शांतता! माथेरानमध्ये फिरताना 'ही' ७ ठिकाणं पाहायला विसरू नका

Pati Patni Aur Panga 2 Set Fire: 'पती पत्नी और पंगा २'च्या सेटवर भीषण आग; 'हसल ५'चाही सेटही आगीच्या विळख्यात

Sitafal khanyache Fayde: सिताफळ खाण्याचे 7 आरोग्यदायी फायदे कोणते?

SCROLL FOR NEXT