Swabhimani Shetkari Sanghatana Andolan In Kolhapur saam tv
महाराष्ट्र

Swabhimani Shetkari Sanghatana Andolan : राजू शेट्टींनी साखर कारखाना काढून दाखवावा असे नेत्याने म्हणताच स्वाभिमानीचे आंदाेलक खवळले अन्...

Swabhimani Shetkari Sanghatana : काेल्हापूरात ऐन दिवाळीत ऊस आंदोलनाचा भडका उडाला आहे.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News :

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari Sanghatana andolan in kolhapur latest marathi news) माध्यमातून सुरु असलेल्या ऊस आंदोलनाचा कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागांत चांगलाचा भडका उडाल्याचे पाहयला मिळत आहे. आज (साेमवार) दोन ठिकाणी संतप्त आंदोलकांनी उसाच्या गाड्या पेटवल्या. (Maharashtra News)

शिरोळ तालुक्यातील अकिवाट येथे साखर कारखान्याला जाणारा ऊस स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रोखला. या ठिकाणी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. साखर कारखानदारांचे प्रतिनिधी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांत घटनास्थळी बाचाबाचीचा प्रसंगही घडला. दरम्यान आंदोलनाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

राजू शेट्टींनी (raju shetti latest news) साखर कारखाना काढून दाखवावा असे नेत्याने म्हणताच स्वाभिमानीचे आंदाेलक खवळले. त्यानंतर वादावादी झाली. पाेलीसांनी दाेन्हीकडील बाजूस समज दिल्याने काही काळानंतर तापलेले वातावरण शमले.

दरम्यान पालकमंत्र्यांच्या कागल तालुक्यातही शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहयला मिळाले. कापशी खोर्‍यातील परिसरात आंदाेलनाचा भडका उडाला. शेतक-यांनी संताजी घोरपडे, शाहू कारखाना, बिद्री कारखान्याची ऊस वाहतूक रोखली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ऐन दिवाळीत शेतकरी संघटनेचे आंदाेलन पेटल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पाेलीसांची त्रेधा तिरपीट उडत असल्याचे दिसून येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दहावीच्या पेपर तपासणीचा मोठा घोटाळा; कुठे घडलाय हा धक्कादायक प्रकार? VIDEO

Maharashtra Live News Update: निलंगा बस डेपोत उभ्या असलेल्या बसने घेतला पेट

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या नावे रमाई आवास योजनेत घोटाळा; फडणवीसांच्या नावाचं बनवलं चक्क आधार आणि रेशनकार्ड

रत्नागिरीला भूकंपाचा हादरा; घाबरून लोक घराबाहेर पळाले

LPG Crisis : 'गॅस' भडका शमवण्यासाठी ओतणार 'रॉकेल'; टंचाईवर काढला तोडगा, सरकारनं घेतले २ महत्वाचे निर्णय

SCROLL FOR NEXT