swabhimani shetkari sanghatana andolan at sangrampur tashil office  saam tv
महाराष्ट्र

Swabhimani Shetkari Sanghatana : 'स्वाभिमानी'ने राज्य सरकारला दिली आठवड्याची मुदत, सळो की पळो करून सोडण्याचा प्रशांत डिक्करांचा इशारा

नुकसानग्रस्त भागातील पंचनामे तातडीने पूर्ण करा अशी मागणी डिक्कर यांनी केली.

संजय जाधव

Buldhana News :

अतिवृष्टीची मदत मिळत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेकडो शेतकऱ्यांसह बुलढाणा (Buldhana) संग्रामपूर तहसिल कार्यालयावर आक्रोश काढला. या माेर्चाचे नेतृत्व स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर (Prashant Dikkar) यांनी केले. (Maharashtra News)

मागील काळात झालेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही तसेच आता पाच दिवस अवकाळी पाऊस झाला. त्याचे अद्याप पंचनामे झालेले नाहीत. यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. सरकारच्या या निष्काळजीपणाचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने (Swabhimani Shetkari Sanghatana) जाहीर निषेध करीत संग्रामपूर तहसील कार्यालयासमोर हजारो शेतकऱ्यांसह आक्रोश करीत ठिय्या आंदोलन केले.

अतिवृष्टीने खरडून गेलेल्या जमिनीवरील शेतकऱ्यांना कर्ज माफ करा, 100 टक्के पीक विमा व कापूस सोयाबीनचे भाव वाढीवर केंद्र सरकारने निर्णायक भूमिका घ्यावी या व अन्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केल्या.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात अन्यथा पुढील आठवड्यात राज्य सरकारला सळो की पळो करून सोडणार असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डोक्यावर हेल्मेट नाही, हँडलवर हात न ठेवता तरुणीने सुसाट बाईक पळवली, धोकादायक स्टंटबाजीचा VIDEO व्हायरल

Hair Wash Risks: सलोनमध्ये केस धुतल्याने ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो का? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

Maharashtra Live News Update: वेण्णालेक येथे अडकलेली बोट बाहेर काढण्यात आली, पर्यटकांनी सोडला सुटकेचा निश्वास

Shocking: नवऱ्याचं दुसऱ्या महिलेसोबत लफडं; बायकोने घडवली कायमची अद्दल, गुप्तांगावर फेकलं उकळतं पाणी अन् अ‍ॅसिड

Thamma Collection : 'थामा'ची बंपर ओपनिंग; पहिल्याच दिवशी 'सैयारा'ला पछाडलं, रश्मिका-आयुष्मानची जोडी सुपरहिट

SCROLL FOR NEXT