shetkari sanghatana andolan saam tv
महाराष्ट्र

Aandolan: वीजेसाठी शेतकऱ्यांसह 'स्वाभिमानी' चे कार्यकर्ते उतरले पाण्यात

पाण्याअभावी पीक जळून जात आहेत असे शेतक-यांचे म्हणणे आहे.

गजानन भोयर

वाशिम : शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा सुरळीत मिळत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने (swabhimani shetkari sanghatana) आज पाण्यात (water) उतरून आंदोलन (aandolan) सुरू केले आहे. जाेपर्यंत सुरळीत वीज पूरवठा हाेत नाही ताेपर्यंत पाण्यातून बाहेर येणार नसल्याचे आंदाेलकांनी स्पष्ट केले आहे. (washim latest marathi news)

मालेगाव (malegoan) तालुक्यातील जऊळका, कुत्तरडोह, अमानवडी, येथे यंदा मोठ्या प्रमाणात उन्हाळी पिकांची पेरणी केली आहे. मात्र वीज पुरवठा सुरळीत मिळतं नसल्याने पीक जळून जात आहेत. शेतकऱ्यांनी कित्येकवेळा महावितरणकडे पाठपुरवठा केला. मात्र वीज वितरण कंपनीचे अधिकारी याकडे जाणीव पूर्व दुर्लक्ष करीत असा आराेप शेतकरी करु लागले आहेत.

त्यामुळे आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विदर्भ प्रमुख दामू इंगोले व शेतकऱ्यांनी पाण्यात उतरून आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत महावितरण शेतकऱ्यांना सुरळीत वीज देत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असे आंदाेलकांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिक जिल्ह्यासाठी हवामान खात्याकडून तातडीचा 'रेड अलर्ट' जारी

Shocking : धक्कादायक! सासऱ्याच्या धक्क्याने खाली पडून सुनेचा मृत्यू; ८ महिन्यांची चिमुकली आईविना पोरकी

Fatty Liver: लिव्हरवर फॅट्स जमा होऊन सूज आलीये? रोज प्या ही ३ ड्रिंक्स, काही दिवसातच वितळून जाईल चरबी

Local Body Election : राज्यात पुन्हा निवडणुकीचं बिगुल वाजणार, २० जिल्हा परिषदा, पंचयत समित्या, ग्रामपंचायतमध्ये धुरळा

Rain Alert : राज्यात मुसळधार पाऊस धुमाकूळ घालणार! ३१ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता; IMD चा मोठा अलर्ट

SCROLL FOR NEXT