Swabhimani Shetkari Sanghatana, amravati saam tv
महाराष्ट्र

Swabhimani Shetkari Sanghatana News : अमरावतीत कृषी विभागावर 'स्वाभिमानी' चा गंभीर आराेप, कार्यालयासमाेर मांडला ठिय्या

मागण्या मान्य झाल्यास आगामी काळात तीव्र आंदाेलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानीने दिला.

Siddharth Latkar

- अमर घटारे

Amravati News : अमरावती जिल्ह्यात 24 हजार शेतकरी पिक विमात अपात्र करण्यात आल्याने एकच गाेंधळ उडाला आहे. तसेच 13 हजार शेतकाऱ्यांना अद्याप विमा मिळाला नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने (Swabhimani Shetkari Sanghatana) आज (शुक्रवार) (amravati) जिल्हा कृषी कार्यालयावर आंदोलन छेडले. (Maharashtra News)

अमरावती जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तसेच अवकाळी पावसामुळे देखील नुकसान झालं. मात्र पीक विमा काढूनही विविध कारणे देऊन अमरावती जिल्ह्यातील 24 हजार शेतकऱ्यांना पिक विम्यात अपात्र करण्यात आले. तर जिल्ह्यतील 13 हजार शेतकऱ्यांना पिक विमा मिळालेला नाही.

त्यामुळे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अमरावती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढत आंदोलन करण्यात आले. अमित अढाऊ (स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष) म्हणाले पिक विमा कंपनीला कृषी विभाग पाठीशी घालत आहे. पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केली. त्यामुळे पिक विमा कंपनीवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी अढाऊंसह आंदाेलकांनी केली.

अपात्र शेतकऱ्यांना पात्र करून शेतकऱ्यांना पिक विमा देण्यात यावा ही मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली. दरम्यान कृषी कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन झाल्याने तत्काळ तेथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Metro : मुंबई मेट्रो ४ चे ऑडिट करण्याचे आदेश! आर-सिटी मॉलजवळील 'त्या' भेगांमुळे प्रशासन हादरले

Accident : ४ दिवसापूर्वी साखरपुडा आज काळाने घात केला; धाराशिवमध्ये अक्षय-अक्षयाचा मृत्यू

Vijay and Rashmika: लग्नाची तयारी जोरदार सुरु...; विजय देवरकोंडा अन् रश्मिका मंदान्ना उदयपुरला निघाले , पाहा VIDEO

Bigg Boss Marathi 6 : टोळी फुटली; रुचिताचा खरा चेहरा रोशनसमोर आला, पाहा धक्कादायक VIDEO

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये महिलांचा तुफान राडा

SCROLL FOR NEXT