Dr. Suvarna Waje Nashik: डॉ. सुवर्णा वाजे यांचा खून साडेतीन कोटींसाठी; पोलिसांच्या तपासात आले समोर? अभिजित सोनावणे
महाराष्ट्र

Dr. Suvarna Waje Nashik: डॉ. सुवर्णा वाजे यांचा खून साडेतीन कोटींसाठी; पोलिसांच्या तपासात आले समोर?

याप्रकरणी डॉ. सुवर्णा वाजे यांचा पती संदीप वाजे हा मुख्य संशयित आरोपी आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिकः नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे (Dr. Suvarna Waje) यांच्या खुनाचे फक्त कौटुंबिक कलह कारण नाही तर, तब्बल साडेतीन कोटीकरिता त्यांना अतिशय क्रूर पद्धतीने संपवल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी डॉ. सुवर्णा वाजे यांचा पती संदीप वाजे (Sandeep Waje) हा मुख्य संशयित (suspect) आरोपी आहे. शिवाय त्याला मदत करणाऱ्या आणखी एका संशयिताला पोलिसांनी बेड्या ठोकले आहे. (Suvarna Waje Nashik police investigation came fore)

डॉ. सुवर्णा वाजे यांच्या खुनाला अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने मूर्त स्वरूप दिले गेले आहे. त्यांचा खून करून मृतदेह जाळला आहे. त्यांच्या मोबाईल मधील माहिती डिलिट करण्यात आली आहे. मात्र, पोलिसांना मोबाइल मधून माहिती मिळाली असून, त्या मधून बरेच काही सत्य समोर आल्याचे समजत आहे. विशेष म्हणजे घटना घडली त्या दिवशी रात्री संदीप आणि त्याच्या साथीदाराचे लोकेशन घटनास्थळावर आढळले आहे.

हे देखील पहा-

डॉ. सुवर्णा वाजे यांचा पती संदीप वाजेचे विवाह्यबाह्य संबंध होते. त्याला दुसरे लग्न करायचे होते. यामुळे त्याला डॉ. सुवर्णा वाजे यांचा अडथळा वाटत असायचा. संदीपच्या विवाह्यबाह्य संबंधाची डॉ. सुवर्णा वाजे यांना माहिती होती. त्यांनी संदीपला घटस्फोट देण्याकरिता 50 लाख रुपयांची मागणी केली होती. शिवाय संदीपने काही जमीन विकली होती. त्यामधून त्याच्याकडे कोट्यवधी रुपये आले होते. यातले तीन ते साडेतीन कोटी रुपये डॉ. सुवर्णा वाजे यांना द्यावे लागले असते. त्याला हे पैसे त्यांना द्यायचे नव्हते. यामुळे संदीपने डॉ. वाजे यांना संपवल्याचे समोर येत आहे.

डॉ. सुवर्णा वाजे यांचा खून झाला. त्या दिवशी त्यांचे पती संदीप बरोबर एकूण 14 वेळा संभाषण झाल्याचे समोर आले आहे. शिवाय संदीप विरोधात डॉ. सुवर्णा वाजे यांनी आपल्या क्लिनिमध्ये लिहून ठेवलेली चिठ्ठी मिळाली आहे. यामुळे हे प्रकरण अतिशय ठळकपणे समोर आले आहे. मात्र, यावर डॉ. सुवर्णा वाजे यांचा पती संदीपने अजून देखील कबुली जबाब दिला नाही. तो पोलिसांसमोर काही बोलत नाही. यामुळे हे सारे सिद्ध करणे पोलिसांना कठीण जात आहे.

डॉ. सुवर्णा वाजे खुनप्रकरणामध्ये संदीपला त्याचा मावसभाऊ बाळासाहेब म्हस्के यांनी देखील मदत केली आहे. त्याला पोलिसांनी बेड्या ठोकले आहेत. मात्र, तो ही तपासात असहकार्य करत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे या म्हस्केवरही त्याच्या पत्नीला ठार केल्याचा आरोप आहे. 1997 मध्ये त्याच्या पत्नीने आत्महत्या केली होती. याप्रकरणी 2000 मध्ये निकाल लागला. म्हस्केला 5 वर्षांचा कारावास झाला होता. मात्र, उच्च न्यायालयात जामीन मंजूर झाल्याने तो बाहेर होता. त्यानेच संदीपला सहकार्य केल्याचे समोर आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brain Exercises: मेंदूला तीक्ष्ण करण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी करा 'या' ब्रेन ॲक्टिव्हिटिज

Thane Traffic : घोडबंदर रस्त्यावर वाहतूक कोंडी वाढली; जाणून घ्या कारण

Gokak Waterfalls: सांगलीपासून २ तासांच्या अंतरावर आहे 'हा' धबधबा; गर्दी नको असेल तर आहे परफेक्ट डेस्टिनेशन

Nag Panchami 2025: नागपंचमीला शिवलिंगावर या ३ गोष्टी अर्पण केल्याने दूर होतात संकटं

Dhadgaon News : अंगणवाडी मदतनीस पदावर नियुक्त महिलेला मारहाण; नंदुरबार जिल्ह्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT