Nashik News Saam TV
महाराष्ट्र

Nashik News: नवविवाहित दांपत्याचा संशयास्पद मृत्यू; खरं कारण दडलेली डायरी पोलिसांच्या हाती

त्यांनी एवढं टोकाचं पाऊल का उचललं असावं याचा तपास पोलीस करत असताना पोलिसांच्या हाती एक चिठ्ठी लागली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Nashik News: नाशिकच्या (Nashik) पाथडी शिवारात रविवारी एका नवविवाहित दांपत्याने आत्महत्या केली आहे. नयनतारा गोल्ड या सोसायटीत गौरव जगताप (वय वर्षे २८) आणि नेहा जगताप (वय वर्षे २४) हे जोडपं राहत होतं. राहत्या घरी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. दोघेही सुशिक्षित होते. तसेच छान आयुष्य जगत होते. मग त्यांनी एवढं टोकाचं पाऊल का उचललं असावं याचा तपास पोलीस करत असताना पोलिसांच्या हाती एक चिठ्ठी लागली आहे. यात या दोघांच्या आत्महत्येमागचं कारण दडलेलं आहे. (Latest Marathi News)

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, घरातल्या देव्हाऱ्यात ठेवलेल्या एका डायरीत गौरव आणि नेहा यांनी लिहिलेली सुसाईड नोट सापडली आहे. या सुसाईड नोटमध्ये एका इसमाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याच म्हटलं आहे. आज त्यांच्या नातेवाईकांना याच घरात देव्हाऱ्यात एक डायरी मिळाली आणि या डायरीत त्यांच्या आत्महत्येमागचे कारण समोर आले आहे. कर्जाला कंटाळून, काही लोकांकडून घेतलेल्या पैश्याच्या वसुलीसाठी संबंधित व्यक्तींकडून झालेल्या त्रासाला, धमक्यांना,आणि काही लोकांकडून लाखोंची फसवणूक झाल्याने त्यांनी ही आत्महत्या केल्याची सुसाईड नोटमध्ये त्यांनी म्हटले आहे.

गौरव आणि नेहा या दोघांनाही काहींनी लाखो रुपयांचा गंडा घातला होता. त्यामुळे त्यांना आर्थिक चणचण भासत होती. अशात त्यांनी काही व्यक्तींकडून उसने पैसे घेतले होते. उसने पैसे घेतल्यावर घर खर्च आणि घेतलेल्या पैशांची परतफेड करण्यात त्यांना मोठ्या अडचनींचा सामना करावा लागत होता. यात तीन व्यक्तींचे कर्ज त्यांना डोईजड झाले होते. तसेच त्या व्यक्तींकडून त्यांना धमक्यांचे फोन देखील येत होते. याच जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे डायरीमधून समज आहे, असे पोलिसांनी सांगितले.

डायरीमध्ये त्यांनी तिघांचे नाव नमूद केली आहेत. पोलिसांनी ही डायरी ताब्यात घेतली असून इंदिरानगर पोलीस त्या दिशेने आता तपास करत आहे. काल पाथर्डी फाटा परिसरात असलेल्या अनमोल नयनतारा गोल्ड या सोसायटीत राहणाऱ्या गौरव जगताप आणि नेहा जगताप या विवाहित दाम्पत्याने राहत्या घरात फाशी घेत आत्महत्या केली. त्यांच्या मावशीने घरी फोन केला तेव्हा कोणीही फोन उचलला नाही. त्यामुळे मावशीने आपल्या बारक्या मुलाला त्यांच्या घरी पाठवले. बराच वेळ दरवाजा उघत नसल्याने तो तोडल्यावर दोघे पती पत्नी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. या प्रकरणात आता पोलीस डायरीत नावे असलेल्या तीन व्यक्तींचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Veen Doghantali Hi Tutena : स्वानंदी-समरमध्ये मैत्री खुलणार; 28 दिवसांत मालिका कोणते नवीन वळण घेणार? पाहा अनोखी लव्हस्टोरी | VIDEO

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता कधी येणार? या दिवशी येऊ शकतात ₹२०००

Ajit Pawar Death: विमानात अजितदादांसोबत भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती? खासदाराच्या शंकेने राजकारणात खळबळ

Crime News : नवऱ्याने मोबाईल घेऊन द्यायला नकार दिला, महिलेने मुलासह विहिरीत उडी मारली अन्...

Maharashtra Live News Update: रत्नागिरी जिल्हा परिषदेवर भगवा फडकेल - उदय सामंत

SCROLL FOR NEXT