Nagpur News Saam Tv
महाराष्ट्र

नागपुरात दोन बहिणींचा संशयास्पद मृत्यू प्रकरण; पोटात विष गेल्याने मृत्यू झाल्याची शक्यता

५ जुलै रोजी नागपूर जिल्ह्यातील पाटणसावंगी येथे दोन सख्या बहिणींचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

मंगेश मोहिते

नागपूर - ५ जुलै रोजी नागपूर जिल्ह्यातील पाटणसावंगी येथे दोन सख्या बहिणींचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली होती. दोन्ही बहिणींच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी मुलींच्या पोटात विष गेल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असा संशय नागपूर (Nagpur) ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी व्यक्त केली आहे.

हे देखील पाहा -

या संदर्भात शवविच्छेदन आणि विसेरा अहवालाची प्रतीक्षा आहे,त्यानंतरचं या बाबत ठोस माहिती देता येईल असं देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.साक्षी फुलसिंग मीना (६) आणि राधिका फुलसिंग मीना (३) असे मृत्यू झालेल्या दोनही चिमुकल्यांचे नावं आहेत. साक्षी आणि राधिका यांची आई मधुरीचे महेर मूळचे पाटणसावंगी येथील आहे.

पोलिसांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार दोन महिन्यापासून मुलींची आई माधुरी फुलसिंग मीना ही पूनम, साक्षी व राधिका या तीन मुलीसह येथील बाजार चौक परिसरात राहणाऱ्या आई गंगाबाई भैयाजी काळे यांच्या घरी राहत होती.

११ वर्षांपूर्वी मधुरीचे लग्न राजस्थान बरबटेकडी येथील फुलसिंग मीना यांच्या सोबत झाले होते. त्यांना तीन मुली आहे. माधुरी सुमारे दोन महिन्यांपूर्वी तीनही मुलींना घेऊन माहेरी राहण्यासाठी आल्या होत्या. मंगळवारी सकाळी राधिका आणि साक्षीची तब्येत बरी नसल्याने माधुरी यांनी दोघींना प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले तेव्हा डॉक्टरांनी राधिकाला तपासून मृत घोषित केलं तर साक्षीला उपचारासाठी नागपुरला पाठवलं असता वाटेत तिचा देखील मृत्यू झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver Infection: शरीराच्या या भागात वेदना होत असेल तर समजा लिव्हर खराब झालंय; इन्फेक्शनचे असतात हे संकेत

Homemade Idli Recipe: घरीच बनवा साऊथ इंडियन स्टाईल इडली, लगेच करा नोट करी ही रेसिपी

Bhau Kadam: 'वडील फक्त रडत होते…', भाऊ कदम यांनी सांगितला ‘तो’ खास भावनिक प्रसंग, म्हणाले- 'आज इतकं नाव कमावलं पण...'

पिंपळे परिवारावर दुखा:चा डोंगर; भाजप आमदाराच्या वडिलांचं निधन; मंत्र्यांकडून शोक व्यक्त

देशात मोठ्या घातपाताचा कट उधळला, डॉक्टराच्या घरातून 300 किलो RDX, एके ४७ अन्...

SCROLL FOR NEXT