Kolhapur News : Saam tv
महाराष्ट्र

Kolhapur News : खासगी बँकेत नोकरी करणाऱ्या तरुणीचा संशयास्पद मृत्यू; ४ महिन्यांपूर्वी झाला होता साखरपुडा

Kolhapur Youth girl death Case : कोल्हापुरातून धक्कादायक वृ्त्त समोर आलं आहे. कोल्हापूरच्या शनिवार पेठ परिसरातील एका तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

रणजीत माजगावकर, कोल्हापूर

Kolhapur girl death :

कोल्हापुरातून धक्कादायक वृ्त्त समोर आलं आहे. कोल्हापूरच्या शनिवार पेठ परिसरातील एका तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिच्या घरातील सदस्यांना ताब्यात घेतले आहे. या तरुणीच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरच्या शनिवार पेठ परिसरातील वैष्णवी लक्ष्मीकांत उर्फ बाळु पोवार या तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. या तरुणीच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी तिच्या आईसह भावास ताब्यात घेतल्याचे समजते. वैष्णवीच्या मृत्यूचे करण अजून स्पष्ट झालेले नाही.

या तरुणीच्या अंगावर मारहाणीचे वळ असल्याने तिचा घातपात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. वैष्णवी यांच्या कुटुंबीयांचे चप्पल लाईनला व्हरायटी लेदर नावाचे चप्पल दुकान आहे. तसेच वैष्णवी ही एका खासगी बँकेत नोकरी करत होती. तसेच तिचा चार महिन्यांपूर्वी साखरपुडा झाल्याचे समजते. पोलिसांकडून या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

SCROLL FOR NEXT