six police suspended from akola  Saam Tv
महाराष्ट्र

गुटखा प्रकरण भाेवलं; 'डीबी' चे सहा पाेलीस कर्मचारी निलंबित

याप्रकरणी जुने शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जयेश गावंडे

अकोला : अमरावती (amravati) येथील आयजीच्या पथकाने अकोल्यात (akola) येऊन गुटख्यावर कारवाई केल्याने याचा ठपका अकोल्यातील जुने शहर पोलिसांवर ठेवत जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांनी बिट जमादारसह संपूर्ण डीबी पथकातील कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. या कारवाईमुळे अकोला पोलिसांत (akola police) एकच खळबळ उडाली आहे. (akola latest marathi news)

अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या विशेष पथकाने तीन दिवसांपूर्वी अकोल्यातील बिझनेस सेंटर येथे एका ट्रकमधून तब्बल ४० लाखाचा गुटखा जप्त केला होता. यावेळी तीन ते चार जण घटनास्थळावरून फरार झाले होते. याप्रकरणी जुने शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान या प्रकरणात जुने शहर डीबी स्कॉडने कसुरी केल्यामुळे पथकातील सहा पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. यासोबत जुने शहर ठाणेदार, एलसीबी प्रमुख आणि जिल्हा पोलिस अधीक्षक पथक यांचाही कसुरी अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात आला आहे. दरम्यान या कारवाईमुळे अकोला पोलिसांत एकच खळबळ उडाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! हे आयडी लगेचच तयार करा, अन्यथा पीएम किसान योजनेचा हप्ता विसरा

Chhattisgarh : ३६ किल्ल्यांची भूमी छत्तीसगड! भारतात लपलेला ऐतिहासिक खजिना, तुम्ही कोण-कोणते किल्ले पाहिलात?

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये रिंगरोड बाधित शेतकऱ्यांचे भाजप कार्यालयावर आंदोलन

Good News : LPG दरात झाली मोठी घट, ऑटो चालकांना मोठा दिलासा, पाहा आता किती रूपयांना मिळणार?

पांढरे केस होतील काळे! तुरटी आणि आवळ्याचा 'हा' सोपा उपाय ठरेल फायदेशीर

SCROLL FOR NEXT