Sushma Andhare Saam Tv
महाराष्ट्र

Sushma Andhare News: ऊसतोड कामगार मंडळाला कोट्यावधींचा निधी आल्याचा दावा खोटा... सुषमा अंधारेंचा बीडमधील नेत्यांवर निशाणा

Beed Politics: शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांचा जनतिर्थ ते शिवतिर्थ यात्रा सध्या बीड जिल्ह्यामध्ये सुरू आहे. हा दौरा करत असताना त्यांनी बीड जिल्ह्यातील शेतकरी आणि ऊसतोड कामगारांशी संवाद साधला.

विनोद जिरे

Beed News:

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांचा मातृतिर्थ ते शिवतिर्थ यात्रा सध्या बीड जिल्ह्यामध्ये सुरू आहे. हा दौरा करत असताना त्यांनी बीड जिल्ह्यातील शेतकरी आणि ऊसतोड कामगारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बीड जिल्ह्यातील दिग्गज नेते आणि ऊसतोड कामगारांच्या नेत्यांवर देखील टीका करत सवाल केला आहे..

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

"मी सध्या राज्यभराचा दौरा करतेय. या दौऱ्यादरम्यान शेतकरी, शेतमजुरांचे प्रश्न समोर येत आहेत. बीडमध्ये आले असता मी ऊसतोड कामगारांशी संवाद साधला, यावेळी लक्षात आले की ऊसतोड कामगारांना ऊसतोड कामगार महामंडळाची माहिती नाही. एकीकडे बीडमधील नेते या ऊसतोड कामगारांच्या जीवावर राजकारण करतात," अशी टीका अंधारेंनी (Sushma Andhare) केली.

तसेच "एकीकडे बीडमधील (Beed) नेते या ऊसतोड कामगारांच्या जीवावर राजकारण करतात, त्यांच्या महामंडळासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आल्याचे सांगतात. परंतु प्रत्यक्षात या महामंडळाच्या माध्यमातून कुठल्याही योजना राबवल्या नसल्याचे आता समोर येत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

"असे असेल तर महामंडळाची घोषणा करून राज्य सरकारने काय साध्य केले ? असा सवाल शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलाय. या महामंडळाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची गरजही सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

Maharashtra Politics : शिवतीर्थावर ठाकरे बंधूंची भेट;महापालिकेची रणनिती ठरली? VIDEO

Astrology: 'या'५ राशींवर होणार धनवर्षाव, द्विद्वाद योगामुळे होतील मोठे फायदे

SCROLL FOR NEXT