Maratha and OBC reservation conflict latest news in Maharashtra saam tv
महाराष्ट्र

सुप्रिया सुळे आणि विखेंकडे OBC प्रमाणपत्र, वडेट्टीवार आणि हाकेंचा मोठा आरोप

Supriya Sule Vijay Wadettiwar Obc Certificate Row Mva Politics: मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा आरोप काही ओबीसी नेत्यांनी केलाय... मात्र याचं आरोपांमुळे मविआत वादाची ठिणगी पडलीय... नेमकं प्रकरण काय आहे? कोणत्या मराठा नेत्यांवर ओबीसी प्रमाणपत्र घेतल्याचा आरोप करण्यात आलाय...पाहूयात यावरचा हा रिपोर्ट..

Suprim Maskar

कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरवल्यावरून जरांगे पाटलांनी आक्रमक भूमिका घेतलेली असताना आता मराठा नेत्यांकडेच OBC प्रमाणपत्र असल्याचा दावा काही ओबीसी नेत्यांनी केलाय...काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी तर थेट खासदार सुप्रिया सुळेंकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा केल्यानं महाविकास आघाडीत स्फोट झालाय. वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले ऐका...

वडेट्टीवारांच्या विधानानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आक्रमक पवित्रा घेत काँग्रेसला थेट इशारा दिला...तर ठाकरेसेनेनं सावध भूमिका घेतलीय. खासदार सुप्रिया सुळेंनी मात्र वडेट्टीवारांचा दावा खोडून काढलाय...वडेट्टीवारांनी पुरावा द्यावा अथवा माफी मागावी अशी मागणी केलीय.

खासदार सुप्रिया सुळेंनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर वडेट्टीवारांनी माघार घेत अनावधानाने नाव घेतल्याचं सांगत खेद व्यक्त केलाय...वडेट्टीवार म्हणाले...ओबीसी प्रमाणपत्राच्या संदर्भात माझी भूमिका मांडताना खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचा अनावधानाने उल्लेख झाला. त्यामागे त्यांच्यावर कोणताही आरोप करण्याचा माझा हेतू नव्हता. अनावधानाने त्यांच्या नावाचा उल्लेख झाल्याबद्दल खेद व्यक्त करतो.

दुसरीकडे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या बायकोचे कुणबी जातीचे प्रमाणपत्र काढून ओबीसींची जागा बळकावल्याचा आरोप ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी केलाय. तर विखेंनी या आरोपवर थेट उत्तर देणं टाळलंय.

का बाजूला सुप्रिया सुळेंनी या प्रकरणावर प़डदा टाकला असला तरी आरक्षणाच्या मुद्द्यावरून मविआतील नेत्यांमधले वाद चव्हाट्यावर आले आहेत. आधीच कुणबी दाखल्यांवरून मराठा आणि ओबीसींमध्ये संघर्षाचं वातावरण आहे. आता ओबीसी नेत्यांनी या वादात मराठा नेत्यांना ओढल्यामुळे हा संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राहुल गांधींच्या परीक्षेत 50% सचिव नापास; परीक्षा पॅटर्नमुळे काँग्रेस यश मिळणार?

Manoj Jarange Patil: कॅबिनेटमध्ये मनोज जरांगेंविरोधात नाराजीचा सूर; भाजपचे मंत्री आक्रमक

Gokul Election: महायुतीत जागावाटपावरून फूट? गोकुळच्या मैदानात अमित शाह?

Mumbai News: नाल्यात टाकत होते कचरा, ड्राय वेस्ट वाहनाला पकडलं; BMC कडून ठेकेदाराला नोटीस

मोठी बातमी! शिंदे गटाच्या नेत्याला शिवसेनेच्या शाखेतच बांबूने मारहाण; धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT