Supriya Sule x
महाराष्ट्र

Supriya Sule : पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम: सुप्रिया सुळेंचं वक्तव्य, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया | VIDEO

Supriya Sule Statement : पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चालतं, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी सरकारला विचारला होता. या विधानावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Yash Shirke

  • सुप्रिया सुळे यांच्या "पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चालतं, मग तुम्हाला काय प्रॉब्लेम?" या वक्तव्याने मोठी खळबळ उडाली.

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत सांगितले की, याचं उत्तर महाराष्ट्रातील वारकरी देतील.

  • भाषणात सुळे यांनी सरकारवर, क्रीडामंत्र्यावर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.

अभिजीत सोनावणे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Nashik : स्वातंत्रदिनी कल्याण-डोबिंवलीसह राज्यात अनेक ठिकाणी मांसविक्री बंदीचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. प्रशासनाच्या आदेशावरुन विरोधकांनी सत्ताधारी महायुती सरकारवर टीका केली होती. या प्रकरणावर आता सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी 'पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चालतं', असे वक्तव्य केले आहे.

नाशिकमधील दिंडोरीच्या खेडगावमध्ये महात्मा फुले यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी सरकारला थेट सवाल केला. माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चालतं, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम? आम्ही आमच्या पैशाने मटण खातो, आम्ही कुणाचे मिंधे नाही, असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले.

सुप्रिया सुळे यांनी क्रीडामंत्री (माजी कृषीमंत्री) यांच्यावर देखील खरमरीत टीका केली. पत्ते तुम्ही खेळायचे आणि कोर्टात चकरा आम्ही मारायच्या का? तुमची अब्रु तुमच्याच माणसाने घालवली. रोहित पवार यांना सारख्या नोटीसा येत असतात. आमचे रोहित घाबरत नाही, असे सुप्रिया सुळे यांनी भाषणादरम्यान म्हटले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे सुप्रिया सुळे यांनी आभार मानले. सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'दहा वेळेस वेळ मागून देखील राज्याचे मुख्यमंत्री आम्हाला वेळ देत नाहीत. म्हणून आम्ही थेट दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतो.' त्यांनी विचारलेल्या 'पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चालतं, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले. 'मी देणार नाही, याचं उत्तर महाराष्ट्रातील तमाम वारकरी देतील', असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad Fort: रायगडाचा महादरवाजा शत्रूला लांबून कधीच दिसू नये असा का बांधला होता?

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी मनिषा हवालदारची जेलमध्ये रवानगी

Rajeev Verma: अमिताभ बच्चन यांचे साडू, प्रसिद्ध अभिनेते अचानक बॉलिवूडपासून झाले दूर; आता चालवतात हॉटेल

एकही केस गळणार नाय! रात्री झोपण्यापूर्वी करा 'हा' 1 सोपा उपाय; केस होतील लांब आणि मजबूत

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा तळतळाट महायुतीला पडेल महागात; वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप

SCROLL FOR NEXT