Supriya Sule reply to Raj Thackeray Speech In Karad SAAM TV
महाराष्ट्र

Karad: पुराव्यानिशी बाेलते, काहीही बोलत नाही! सुप्रिया सुळेंचा राज ठाकरेंना टाेला

खासदार सुप्रिया सुळे आज कराड शहरात आल्या आहेत.

साम न्यूज नेटवर्क

सातारा : मला पूराव्यांच्या आधारे बाेलायला जमते. मी थिल्लर बोलत नाही असे सांगत खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी पवार साहेब (Sharad Pawar) हे गेली अनेक वर्ष साेलापूरातील (Solapur) सिध्देश्वर मंदिरात (Siddheshwar Temple) जातात असे नुकतेच मला समजले. त्यामुळे काेण काय बाेलतं यापेक्षा डेटाच सांगताेय हे ध्यानात घ्या असे खासदार सुळेंनी (satara) कराड (karad) येथे शरद पवार यांच्यावर राज ठाकरेंनी (raj thackeray) त्यांच्या भाषणात केलेल्या एका टीकेस उत्तर देताना स्पष्ट केले. (supriya sule latest marathi news)

राज ठाकरे यांनी त्यांच्या गुढीपाडव्याच्या (Raj Thackeray) शरद पवार हे नास्तिक आहेत असे म्हटलं हाेते. त्यावर खासदार सुळेंनी कराड येथे आज (शुक्रवार) माध्यमांशी बाेलताना त्यांचे मुद्दे खाेडून काढायला तासभर बास असा टाेला हाणला.

खासदार सुळे म्हणाल्या आत्ताच्या काळात भाषणं करताना काहींना भान राहत नाही. आपण काय बाेलत आहाेत याचे भान ठेवणे गरजेचे बनले आहे. साहेब नास्तिक आहेत असे म्हटले गेले मात्र ते साेलापूरात गेल्यावर अनेक वेळा सिद्धेश्वर मंदिरात गेले हाेते. ही माहिती मला तेथेच नुकतीच समजली. त्यामुळे राज ठाकरेंचे मुद्दे खाेडून काढण्यासाठी तासभर बास असेही सुळेंनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM सुवेंदु अधिकारींचे पहिल्याच कॅबिनेटमध्ये 5 धडाकेबाज निर्णय; पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार सुसाट!

Prediabetes Symptoms: प्री- डायबिटीजची ही ३ सुरुवातीची लक्षणं अजिबात करू नका दुर्लक्षित, तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

Maharashtra News Live Update: सोनं खरेदीबाबत पंतप्रधानांच्या आवाहनाला मंत्री भरत गोगावले यांची अनोखी प्रतिक्रिया

तमिळनाडूत राजकीय घडामोडींना वेग; CM विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट, दोघांमध्ये काय चर्चा झाली?

गोरेगाव-मुलुंड लिंक रोड कधी सुरु होणार? उड्डाणपुलाची काय आहेत वैशिष्ट्ये?

SCROLL FOR NEXT