Supriya Sule Saam Tv
महाराष्ट्र

Amol Mitkari: ब्राह्मण समाजाने भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या...!

अमाेल मिटकरींच्या वक्तव्याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.

भारत नागणे

पंढरपूर : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे (ncp) आमदार अमोल मिटकरी (amol mitkari) हे सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करुन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पक्षाने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी ब्राह्मण समाज बांधवांनी पंढरपुरात (pandharpur) खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांना घेराव घालून केली. (amol mitkari latest marathi update)

खासदार सुप्रिया सुळे या येथील श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनास आल्या हाेत्या. दर्शनानंतर मंदिरातून बाहेर पडताच त्यांना ब्राह्मण समाज बांधवांनी घेराव घातला. यावेळी ब्राह्मण समाज बांधवांनी आमदार मिटकरी हे सातत्याने समाजात तेढ निर्माण हाेतील अशी वक्तव्य करीत आहेत. सांगली येथील त्यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करताे. आपणही त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी ब्राह्मण समाज बांधवांनी सुळे यांना केली.

यावेळी ब्राह्मण समाज बांधवांनी मिटकरी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध म्हणून ट्विट करावे अशी देखील मागणी करण्यात आली. दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी मिटकरी काय म्हणाले ते मला माहिती नाही. त्यांच्या वक्तव्याने तुम्ही दुखावला असाल तर मी याची माहिती घेऊन जयंतरावांशी (जयंत पाटील) चर्चा करेन असे स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शासकीय वसतीगृहातील 40 ते 50 विद्यार्थ्यांना विषबाधा; जेवणानंतर होऊ लागला उलट्या आणि जुलाबचा त्रास

Maharashtra News Live Update: नंदुरबारमध्ये शासकीय वस्तीगृहात 40 ते 50 विद्यार्थ्यांना विषबाधा

जयंत पाटलांना मोठा धक्का; निकटवर्तीयाचं नगराध्यक्षपद रद्द, काय आहे कारण?

Sunday Horoscope : महत्त्वाची कामे पूर्ण करा! 5 राशींच्या व्यक्तींचे नशीब पालटणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

गावाशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं जपलं; ZP शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, सामाजिक बांधिलकीचा आदर्शांप्रती

SCROLL FOR NEXT