supriya sule saam tv
महाराष्ट्र

Supriya Sule: माझा लढा वैयक्तिक नाही वैचारिक आहे; बारामती लोकसभा निवडणुकीवरून सुप्रिया सुळेंचं वक्तव्य

Supriya Sule Vs Sunetra Pawar: सुळेंनी म्हटलं की, हा भातुकलीचा खेळ नाही. माझं काम एका जागेवर आणि नाती दुसरीकडे आहेत. माझी नाती पवार, सुळे यांच्या पुरती मर्यादित नाहीत.

Ruchika Jadhav

अक्षय बडवे

Political News:

बारामतीमध्ये खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दोघी नणंद-भावजयांमध्ये मोठी लढत पाहायला मिळू शकते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी केलेल्या विकास कामाचा रथ आता बारामतीमध्ये फिरू लागला आहे. अशात दोन दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांनी केलेल्या विकास कामाचा रथ देखील बारामतीमध्ये फिरवण्यात आला. त्यामुळे आता सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा मुकाबला पाहायला मिळणार असल्याच्या चर्चा रंगल्यात.

या सर्वांवरून सुप्रिया सुळेंनी म्हटलं की, हा भातुकलीचा खेळ नाही. माझं काम एका जागेवर आणि नाती दुसरीकडे आहेत. माझी नाती पवार, सुळे यांच्या पुरती मर्यादित नाहीत. अनेक नाती प्रेमाची आणि विश्वासाची देखील आहेत. नाती नेहमी माझ्यासोबत राहतील, पण माझी एक वैचारिक बैठक आहे. माझी लढत वैयक्तिक नाही वैचारिक आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

माध्यामांशी संवाद साधताना यावेळी सुप्रिया सुळेंनी अजित पवारांवर देखील निशाणा साधला आहे. कुछ रिश्ते दिल से बनते हैं, माझे अनेकांसोबत विश्वासाचे नाते आहे. त्यामुळे भावनिक आव्हानाला काही अर्थ नाही, असं म्हणत त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय. समोर कोणताही उमेदवार असला तरी मी प्रामाणिकपणे लढणार, असंही सुप्रिया सुळेंनी ठामपणे सांगितलं आहे.

ज्या माणसाने पक्ष स्थापन केला त्यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने चिन्ह हिस्कावून घेतलं. अदृश्य शक्तीने संविधानाची चिरफाड केली आहे. आम्ही सुप्रीम कोर्टात गेलोय. आम्हला तेथून न्याय मिळेल अशी आशा आहे. राष्ट्रवादीचे संस्थापकीय अध्यक्ष शरद पवार आहेत त्यामुळे पक्ष त्यांनाच मिळायला हवा, असा दावाही राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रिया सुळेंनी यावेळी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांची तब्बेत बिघडली, वृंदावनमधील पदयात्रा रद्द

Govinda : गोविंदाच्या इव्हेंटमध्ये राडा! बाउन्सरने धक्काबुक्की केल्याने वाद चिघळला, VIDEO व्हायरल

Chole Bharture Recipe: स्ट्रीट स्टाईल चमचमीत छोले भटुरे बनवायचेत; फॉलो करा ही स्टेप बाय स्टेप रेसिपी

Bharli Gilki Recipe: गिलक्याची भाजी आवडत नाही? मग एकदा ट्राय करा झणझणीत भरली गिलकी, शुन्य मिनिटांत जेवण होईल फस्त

Balushahi Recipe: झटपट घरीच बनवा खुसखुशीत आणि रसाळ बालूशाही, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT