खासदार नवनीत राणा यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा ! Saam Tv
महाराष्ट्र

खासदार नवनीत राणा यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा !

जात प्रमाणपत्र प्रकरणात उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अरुण जोशी

अमरावती : मुंबई उच्च न्यायालयाने अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द केल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान या प्रकरणावर आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयावर स्थगिती देऊन खासदार नवनीत राणा यांना दिलासा दिला आहे. Supreme Court consoles Navneet Rana

सर्वोच्च न्यालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर स्थगिती देताच युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी राजकमल चौकात एकच जल्लोष केला. ढोल ताशे आणि फटाके फोडून आणि एकमेकांना लाडू खाऊ घालून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.

हे देखील पहा -

अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात जातीचे खोटे प्रमाणपत्र तयार करून निवडणूक लढविल्याचा खटला दखल केला होता. त्यावर निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द करून त्यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.या निर्णयामुळे अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली होती.

मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयावर स्थगिती दिल्याने पुढील निर्णयाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. नवनीत राणा यांच्या विरोधात शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी दोन याचिका दाखल केल्या होत्या.

त्यामध्ये पहिली याचिका ही जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्राबाबतची होती. तर दुसरी याचिका ही लोकसभा निवडणूकी दरम्यान केलेल्या जात प्रमाणपत्राबाबतची होती. यामधील २०१७ च्या याचिकेवर निकाल देत खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्र कोर्टाने अवैध ठरवले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकनाथ शिंदेंचा पाटलांना मोठा धक्का! TDCC निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय, मोठा उलटफेर

सौदी अरबमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश; भीषण अपघातात १४ जणांचा मृत्यू

Pune Rainfall: पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपलं, ढगफुटीसदृश्य परिस्थिती; जनजीवन विस्कळीत, पाहा VIDEO

Moong Dal Chilla Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा पौष्टिक आणि चविष्ट मूग डाळ चिल्ला, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: विलास घुले हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कार आणि चाकू SIT कडून जप्त

SCROLL FOR NEXT