r NCP Leaders Prepare to Join Eknath Shinde's Shiv Sena saam tv
महाराष्ट्र

विलिनिकरणाची चर्चा सुरू असतानाच सुनेत्रा पवारांना मोठा धक्का! चार दिग्गज नेते शिवसेनेत प्रवेश करणार; राजकारणात खळबळ

Bharat Gogawale Set to Give Sunil Tatkare a Major Political Blow: रायगडच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता! मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत रोहा येथे चार राष्ट्रवादी नेते शिवसेनेत प्रवेश करणार आहे.

Omkar Sonawane

सूरज मसूरकर, साम टीव्ही

शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे दोन्ही पक्ष जरी सत्तेत एकत्र असले तरी स्थानिक पातळीवर या दोन्ही पक्षात मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळतो. रायगडमध्ये मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यातील राजकीय वैर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आता पुन्हा रायगडच्या राजकारणात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. भरत गोगावले हे सुनील तटकरे यांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. सोमवारी रोहा येथे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये श्रीवर्धन मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष दर्शन विचारे यांनी तब्बल 17 वर्षानंतर घरवापसी म्हणजेच शिवसेनेत परतण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रमोद म्हसकर, सुरेश मगर आणि आप्पा देशमुख यांच्यासह काही महत्वाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती आहे. प्रमोद म्हसकर हे पेण विधानसभा कार्याध्यक्ष असून हे पंचायत समिती सदस्य आहेत. तर आप्पा देशमुख हे सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. या नेत्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे रायगडमधील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान रायगडच्या राजकारणात सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांच्यातील राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे रोह्यातील या पक्षप्रवेशाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या पक्षप्रवेशानंतर रायगडच्या राजकीय समीकरणांमध्ये नेमके कोणते बदल होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Natasha Awhad:डिलिमिटेशन'वरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वादाची ठिणगी; आव्हाडांच्या पोस्टनं खळबळ

Maharashtra News Live Update: मांगलीजवळ ट्रकच्या धडकेत दुचाकी वरील दोघेजण गंभीर

रामायणमधील रामाऐवजी महिलांना रावण का आवडला? जाणून घ्या यामागील मानसशास्त्र

Kitchen Hacks : फ्रिजमध्ये ठेवलेल्या भाज्या किती दिवस टिकतात? जाणून घ्या साठवण्याची योग्य पद्धत

पंढरपुरात बचावकार्य सुरू असतानाच पालकमंत्र्यासह भाजप नेत्यांकडून मजुरांना श्रद्धांजली; सोशल मीडियावरील पोस्टमुळे खळबळ

SCROLL FOR NEXT