Sunetra Pawar’s record-breaking victory in Baramati fuels speculation about her potential Chief Ministerial bid in 2029. saam tv
महाराष्ट्र

2029 साली वहिनींनीच मुख्यमंत्री व्हावं, जय पवारांचं मोठं विधान

Maharashtra Politics Heats Up as Sunetra Pawar CM: बारामती पोटनिवडणूक विक्रमी मताधिक्याने जिंकल्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटात उत्साहाचं वातावरण आहे. त्यातच 2029 ची निवडणूक आणि मुख्यमंत्रीपदावरुन पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी सीएम व्हावं असं कोणी म्हटलंय ?

Girish Nikam

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी २ लाख १८ हजार ३४ अशा विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला. या विजयानंतर राष्ट्रवादीच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. दुसरीकडे यानिमित्ताने २०२९ ची विधानसभा निवडणूक आणि मुख्यमंत्रीपदाबाबतही चर्चा सुरु झालीये. त्याला निमित्त ठरलंय अजित पवारांचा मुलगा जय पवारांचं मोठं विधान...2029 साली वहिनींनीच मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं, असं विधान त्यांनी केलंय.

आता राज्यभरात सुनेत्रा पवारांच्या दौऱ्याचं नियोजन केलं जातंय. दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचे विलिनीकरण करुन पक्षाची ताकद वाढवली पाहिजे, असाही सूर राजकीय वर्तुळात उमटतोय. दुसरीकडे काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार मुख्यमंत्री झाल्या तर आनंदच आहे. 2029 पर्यंत नक्कीच त्यांच्या पाठिशी आम्ही असू, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली होती.

दुसरीकडे महायुतीत शिंदे सेना आणि भाजपमध्ये वारंवार ठिणगी पडत आहे. 2029 मध्ये दोन्ही पक्ष वेगवेगळे लढू शकतात, असं मोठं विधान नुकतंच शिंदे सेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी केलंय. राष्ट्रवादीचे नेते मात्र सावध असून उघडपणे भाजपवर टीका-टीपण्णी करणं टाळतात. सहा वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवलेल्या अजित पवारांना सीएमपदाने हुलकावणी दिली. त्याची सल दादांच्या कुटुंबाला आणि कार्यकर्त्यांना आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या रुपाने राज्याला पहिल्या उपमुख्यमंत्री मिळाल्या आहेत. भविष्यात त्यांच्याच रुपाने पहिल्या महिला मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभणार का? याची उत्सुकता आहे. मात्र त्यासाठी 2029 पर्यंत वाट पहावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : ठसका लागला की वरती बघायला का सांगतात ? कारण ऐकून तुम्ही सुद्धा चक्रवाल

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये मोबाईल दुरुस्तीच्या कारणावरून वाद, दुकान चालकाला टोळक्याकडून बेदम मारहाण

Maharashtra Rain Alert: पाऊस धुमाकूळ घालणार! पश्चिम महाराष्ट्र अन् मराठवाड्यात तुफान पावसाचा अंदाज, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT