Sujay Vikhe Patil Saam Tv
महाराष्ट्र

Sujay Vikhe Patil: महाराष्ट्रातील सगळेच भिकारी शिर्डीत, सुजय विखेंच्या विधानाचा रिॲलिटी चेक

Shirdi Beggars Controversy: शिर्डीत खऱ्या भिक्षेकऱ्यांची संख्या मोजकीच आहे. तसेच अनेकांनी शिर्डीत भिक्षा मागणे हा व्यवसाय बनवला असल्याची माहिती समोर आलीय. सुजय विखेंच्या विधानाचा पाहा रिॲलिटी चेक.

Bhagyashree Kamble

भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी शिर्डीतील भिक्षेकरी आणि प्रसादलयावरून केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वादंग निर्माण झाला. शिर्डीत मोफत जेवणाची व्यवस्था होत असल्यानं राज्यभरातून भिकारी शिर्डीत गोळा होत असतात, असं सुजय विखे म्हणाले होते. याच विधानावर विरोधक आणि भिक्षेकरांनी टीकेची झोड उठवली होती. मात्र, शिर्डीत खऱ्या भिक्षेकऱ्यांची संख्या मोजकीच असून, अनेकांनी शिर्डीत भिक्षा मागणे हा व्यवसाय बनवला असल्याची माहिती समोर आलीय.

सुजय विखे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर विरोधक तसेच साईभक्तांनी आगपाखड केली. त्यांनी केलेल्या वक्तव्यावर सुजय विखे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलंय. 'साईभक्तांना हिणवण्याचा प्रयत्न कुणीही केलेला नाही. साईभक्त आदरणीयच आहेत. पण किती गुन्हेगार भिकाऱ्यांचा सोंग घेऊन तिथे आले आहेत, याची आकडेवारी लवकरच मी जाहीर करेन. प्रसादातून १० रूपये घेतल्यानंतर जी काही रकमेची बजत होईल. त्याचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी करण्यात यावा ही माझी अपेक्षा आहे, आणि या भूमिकेवर मी ठाम आहे, असं सुजय विखे म्हणाले.

शिर्डीत खऱ्या भिक्षेकऱ्यांची संख्या मोजकीच असल्याची माहिती समोर आली आहे. अनेकांनी शिर्डीत भिक्षा मागणे हा व्यवसाय बनवलाय. गेल्या तीन वर्षात शिर्डी पोलिसांनी तब्बल चार हजारांच्या आसपास पुरुष आणि महिला भिक्षेकऱ्यांना ताब्यात घेत, सुधारगृहात पाठवल्याची माहिती आहे. शिर्डीत जवळपास ४०० ते ५०० भिक्षेकरी साई मंदिराच्या परिसरात भिक्षा मागत असतात. तसेच भिक्षा दिली नाही तर, लोकांसोबत वाद आणि शिवीगाळ केल्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत.

सुजय विखे यांच्या विधानानंतर शिर्डीमध्ये राज्यभरातून मोठ्या प्रमाणात गोळा झालेले भिक्षेकरी, त्यातून साईभक्तांना होणारा त्रास, वाढती नशेखोरी आणि गुन्हेगारी हा ज्वलंत मुद्दा ऐरणीवर आलाय. सामाजिक न्याय विभाग आणि शिर्डी पोलिस याबाबत काय उपाययोजना आखतात, हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, नाशिकमधील प्रसिद्ध डॉक्टरचं नाव समोर; गर्भपातासाठी करायचा मदत

Coconut Water Vs Cucumber Water: नारळ पाणी की काकडीचे पाणी? उन्हाळ्यात डिहायड्रेशनपासून वाचण्यासाठी कोणतं ड्रिंक बेस्ट?

Maharashtra News Live Update: शिरूरमध्ये बिबट्याची दहशत; कर्डेलवाडीत गोठ्यातील कुत्र्यावर हल्ला

Ready To Wear Blouse Designs : शिलाईचे झंझट नको गं बाई! उन्हाळ्यात साडीवर स्टाइल करा 'हे' ५ रेडी-टू-वेअर ब्लाउज

Post Office Scheme: ५ लाखांचे होणार १० लाख; पोस्टाच्या या योजनेत फक्त ११५ महिन्यात पैसे होणार डबल

SCROLL FOR NEXT