sujay vikhe patil, eknath shinde, congress, maharashtra government saam tv
महाराष्ट्र

Shirdi : काँग्रेसचं टेन्शन घेऊ नका ! त्यांच्यात हिम्मतच नाही : खासदार सुजय विखे पाटील

शिर्डीत खासदार सुजय विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

साम न्यूज नेटवर्क

- माेबीन खान

Sujay Vikhe Patil : राज्यात खातं वाटप झालेलं नसले तरी कुणाचेही काम अडलेलं नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दाेघेही सक्षम नेते आहेत. ते राज्याच्या हिताचे निर्णय घेताहेत असं मत भाजप नेते खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil News) यांनी नमूद केले. दरम्यान महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची हिम्मत काॅंग्रेसमध्ये नसल्याचा टाेला खासदार पाटील यांनी एका प्रश्नावर काॅंग्रेसला शिर्डीत (Shirdi) लगावला.

खासदार सुजय विखे पाटील हे शिर्डीत आले हाेते. त्यावेळी माध्यमांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तर देताना राज्यात सर्व काही सुरळीत सुरु असल्याचं नमूद केले. दरम्यान सामनामधून बिनखात्याचे मंत्रिमंडळ अशी टीका केली गेली आहे या प्रश्नावर खासदार विखे पाटील म्हणाले लिहिणारे आत गेले. आता सामनात लिहितं कोण हाच मोठा प्रश्न आहे. खाते वाटप झालेलं नसलं तरी कुणाचेही काम अडलेले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही सक्षम नेते आहेत. येत्या १७ तारखेला अधिवेशन असून त्याअगोदर कुठल्याही परिस्थितीत खाते वाटप हाेईल असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद काँग्रेसला हवं आहे. त्यामुळे ते मविआ पासून नाराज आहेत या प्रश्नावर खासदार विखे पाटलांनी बाेचरी टीका केली. ते म्हणाले सगळे एकमेकांना लाचारीने चिटकलेले आहेत. काँग्रेसचा विषय तर हास्यास्पद वाटताे. त्यांच्यात महाविकास आघाडी सोडण्याची हिम्मत नाही. एवढं सगळं होऊनही ते बाहेरून पाठिंबा द्यायला तयार आहेत. त्यामुळं काँग्रेसचं टेन्शन घेऊ नका, पुन्हा सत्तेत येण्याची अपेक्षा असल्याने ते कुठंही जात नाहीत असा टाेला खासदार विखे पाटलांनी लगावला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये विराज प्रोफाइल कंपनीविरोधात आदिवासींचं बेमुदत धरणे आंदोलन; प्रकल्प रद्द करण्याची मागणी

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील प्रमुख रस्त्यावरील वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Daily Habits: तुम्हीही नकळत करताय या चुका? शरीरावर होऊ शकतो गंभीर परिणाम, आजच बदला सवयी

SBI Data Leak : SBI च्या खातेधारकांना मोठा धक्का, नाव, नंबर अन् पत्ता... ग्राहकांची संपूर्ण माहिती डार्क वेबवर लीक

Car Accident: काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याच्या कारचा चक्काचूर; मुंबई-नागपूर हायवेवर भरधाव ट्रकची धडक, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT