Latur: जिल्ह्यात 80 टक्के ऊस शिल्लक तरीही कर्नाटकातील ऊसाची आयात Saam TV
महाराष्ट्र

Latur: जिल्ह्यात 80 टक्के ऊस शिल्लक तरीही कर्नाटकातील ऊसाची आयात

लातूर जिल्ह्यात (Latur District) यावर्षी ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे.

दिपक क्षीरसागर

लातूर: लातूर जिल्ह्यातील साखर कारखाने हे शेतकऱ्यांच्या जीवावर उभा राहीले आहेत, पण हेच साखर कारखाने कर्नाटकातील ऊसाची आयात करत असल्याने लातूर जिल्ह्यातील 80 टक्के ऊस शिल्लक आहे. यामुळे शासनाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तफावतीची रक्कम देऊन दिलासा द्यावा अशी मागणी माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी केली आहे.

लातूर जिल्ह्यात (Latur District) यावर्षी ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. अद्याप अनेक कारखान्याची नोव्हेंबर महिन्याची तिड सुरू आहे, तर दुसरीकडे कर्नाटकातील ऊसाची कमी दरात आयात केली जात असल्याने जिल्ह्यातील किमान 80 टक्के ऊस गाळपाविना शिल्लक आहे यामुळे अनेक शेतकऱ्यांचा ऊस हा 14 महिने होऊन जागेवर उभा असल्याने वजनात घट येत असून नुकसान होत आहे. तर ऊस तोड करणाऱ्या टोळ्या एकरी दहा हजार रुपयांची मागणी करत असून त्याशिवाय तोड करत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

राज्य शासनाने साखर कारखाना कार्यक्षेत्रातील ऊसाचे गाळप करण्याचे आदेश दिले असताना सुध्दा कारखानदार याकडे दुर्लक्ष करत आहेत. शासन मायबाप सरकार असल्याने ऊसाचा तफावतीची रक्कम शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vinesh Phogat: आम्ही तेव्हाच सेफ राहू जेव्हा तुमचे नेते महिला अत्याचार थांबवतील, विनेश फोगाट यांचा भाजपवर निशाणा

Washim Vidhan Sabha : वाशिम विधानसभा मतदारसंघात बंडखोर उमेदवाराचा भाजपात प्रवेश; महायुतीला होणार फायदा

Ajit Pawar Speech : अजित पवारांनी जाहीर कबुल केलं; बारामतीकरांसमोर चूक मान्य करत म्हणाले...VIDEO

Maharashtra Assembly Election 2024: सावधान! मतदानासंदर्भात दिशाभूल करणारे संदेश पाठवाल तर होईल कडक कारवाई

IPL 2024 Mega Auction: IPL स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू

SCROLL FOR NEXT