Sudhir Mungantiwar News Saam TV
महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar News: लाठीचार्ज का केला? उत्तर द्या; मुनगंटीवारांना मराठा तरुणांचा सवाल

Sudhir Mungantiwar On Maratha Aarakshan Morcha: मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी तरुणांनी केली आहे.

Ruchika Jadhav

Maharashtra Political News:

जालन्यात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला काल हिंसक वळण लागलं. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर आंदोलन आनखी चिघळल्याचं चित्र पाहायला मिळालं. आदोलकांनी बसच्या काचा फोडत आणि जाळपोळ करत निषेध व्यक्त केला. या प्रकरणी सत्ताधाऱ्यांसह विरोधक राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. (Latets Political News)

विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर विविध आरोप केलेत. अशात आता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील मराठा तरुणांची भेट घेतली आहे. यावेळी एक मराठा लाख मराठा असं म्हणत तरुणांंनी त्यांना घेराव घातला आहे.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज मराठा तरुणांची भेट घेतली. यावेळी तरुणांनी त्यांना घेराव घालत गोळीबार आणि लाठीचार्ज का केला? या प्रश्नांचे उत्तर मागितले.

जालन्यातील मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज आणि गोळीबार केल्याच्या घटनेनंतर हिंगोलीच्या औंढा शहरात भाजप पदाधिकारी बैठकीच्या निमित्ताने सुधीर मुनगंटीवार तेथे आले होते. यावेळी तरुणांनी त्यांना घेराव घातला.

मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी तरुणांनी केली आहे. यासोबच राज्य सरकारने मराठा आरक्षणाविषयी तातडीने भूमिका जाहीर करण्याची मागणी देखील या तरुणांनी केली आहे. एक मराठा लाख मराठा अशा आशयाच्या घोषणा देत मराठा तरुणांनी मुनगंटीवार यांना घेराव घातला. मुनगंटीवारांनी देखील तरुणांचे म्हणणे ऐकून घेत या संपूर्ण घटनेची चौकशी होईल असे आश्वासन दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य प्रकरणी गुन्हा दाखल

Black Salt Water Benefits: पाण्यात काळे मीठ टाकून प्यायल्यास शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या!

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप! एकाच झटक्यात २ कोटीहून अधिक मतदार यादीतून बाहेर; ३६ जिल्ह्यातील आकडेवारी पाहा

Ladki Bahin Yojana : ऑगस्ट महिन्याचे १५०० रुपये खात्यावर कधी जमा होणार? तारीख आली समोर

Weather Update: मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट! या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार, हवामान विभागाचा अलर्ट

SCROLL FOR NEXT