महाराष्ट्र

विद्यार्थ्यांनो , 11 वी प्रवेशाची वेबसाईट 4 दिवस राहणार बंद; कधी करता येणार प्रवेश अर्ज जाणून घ्या

राज्य शिक्षण महामंडळाने दिलेल्या नव्या वेळापत्रकानुसार, 26 मे ते 3 जूनपर्यंत 11 वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू राहील.

Bharat Jadhav

राज्यातील उच्च माध्यमिक बोर्डाकडून 11 वीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ उडालाय. आता शिक्षण संचालनालयाकडून अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी आता नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. अकरावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रवेश 26 मे पासून सुरू होणार आहे. तर पहिली फेरी प्रत्यक्षात तेव्हाच सुरू होईल. त्यामुळे दोन दिवसांपासून ऑनलाईन प्रवेशासाठी धडपड करणाऱ्या विद्यार्थ्यांना अजून चार दिवस थांबावे लागणार आहेृ.

आज म्हणजे 21 मे रोजी प्रत्यक्षात सुरू होणारी ऑनलाइन अकरावी प्रवेशाची प्रक्रिया वेबसाईट काही तांत्रिक अडचणीमुळे सुरू झाली नाही. त्यामुळे महाराष्ट्र शिक्षण महामंडळाकडून 26 मे ही नवी तारीख देण्यात आली असून 26 मे ते 3 जूनपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश घेता येईल. राज्य शिक्षण महामंडळाने दिलेल्या नव्या वेळापत्रकानुसार, 26 मे ते 3 जूनपर्यंत 11 वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे.

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी वेबसाईट सुरू झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करताना अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे आता प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलण्यात आलीय. आता ही प्रवेश प्रक्रिया दिनांक 26 मे पासून सुरू होणारय.

त्यानुसार विद्यार्थ्यांना 26 मे ते 3 जून दरम्यान आपल्या आवडीच्या महाविद्यालयाचा क्रमांक निवडता येईल. तसेच संपूर्ण अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा अर्ज भरता येईल. तर अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी 10 जूनला जाहीर होईल.

दरम्यान प्रवेश प्रक्रियेसाठी 21 मे रोजी वेबसाईट सुरू केली होती. विद्यार्थी नोंदणी आणि पसंतीक्रम भरण्याची सुविधा पहिल्या फेरीसाठी 28 मे 2025 पर्यंत सुरू राहणार होती. मात्र ती प्रक्रिया रद्द झाली असून नव्याने वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. प्रत्येक विद्यार्थ्याला आवश्यक वेळ देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रवेशाचे वेबपोर्टल मोबाईलद्वारे हाताळताना अधिक सुलभ व्हावे, यासाठी काही वेळासाठी पोर्टलची सुविधा बंद ठेवलीय, असं बोर्डाकडून सांगण्यात आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : साखरपुडा मोडून मुलीनं बॉयफ्रेंडसोबत लग्न केलं, वडील संतापले, नवविवाहीत माहेरी येताच नको ते करून बसले

New Marathi Serial: मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच; तीन महिन्यांत सुरु होणार आठ नव्या मालिका

Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या उपोषणादरम्यान सरकारची मोठी कारवाई, बड्या अधिकाऱ्याचं निलंबन

IPL match fixing : गुजरात-राजस्थान सामन्यात झाली फिक्सिंग ? त्या एका व्हिडिओने उडाली खळबळ, पाहा

Maharashtra News Live Update: रायगड जिल्ह्यात अनेक भागात वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT