धक्कादायक : औरंगाबादमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या! अविनाश कानडजे
महाराष्ट्र

धक्कादायक : औरंगाबादमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या!

त्याने आत्महत्या का केली? त्याच्या मागे नेमके काय कारण आहे? याचा तपास चालू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- अविनाश कानडजे

औरंगाबाद : औरंगाबाद मधील आडगाव बुद्रुक येथील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मृत वैभवचे बीएस्सी पदवीचे शिक्षण पूर्ण झाले असून, तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. घटनेच्या वेळी त्याचे वडील कंपनीमध्ये गेले होते. तर, आई घर कामात व्यस्त होती.

हे देखील पहा :

याच वेळेस वैभव अभ्यास करण्यासाठी आपल्या खोलीत गेला. बराच वेळ झाला तरी वैभव बाहेर आला नसल्याने आईने आवाज दिला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. आईने अनेक वेळा आवाज देऊनही आतून कोणताच प्रतिसाद येत नसल्याने अखेर त्यांनी शेजारील राहिवाश्यांच्या मदतीने दरवाजा तोडला असता त्याने गळफास घेतल्याचे दिसून आले.

दरम्यान, त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, तोपर्यंत वैभवची प्राणज्योत मालवली होती. त्याने आत्महत्या का केली हे स्पष्ट होऊ शकले नाही. या घटनेची चिकलठाणा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याने आत्महत्या का केली? त्याच्या मागे नेमके काय कारण आहे? याचा तपास चालू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guru Purnima 2025: सर्वात मोठा गुरुमंत्र कोणता? जाणून घ्या त्यामागील आध्यात्मिक कारण

Thackeray: ठाकरे बंधूंची युती होणार की नाही? राज ठाकरेंच्या आदेशानं संभ्रम; पदाधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश

Gold Price Today: गुड न्यूज! आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण; १ तोळ्यासाठी किती रुपये मोजावे लागणार?

Kalyan Police News : वाहतूक पोलिसांची मनमानी, चहा पिण्यासाठी रस्त्यात गाडी उभी केली, ट्रॅफिक जाममुळे नागरिक संतापले

Maharashtra Live News Update : विदर्भातील सात जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT