Horrific Accident  Saam tv
महाराष्ट्र

Horrific Accident : मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताचा थरार; सरस्वती पूजन करून परतताना विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू

mumbai goa highway accident today : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झालाय. सरस्वती पूजन करून परतताना विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली.

Vishal Gangurde

सरस्वती पूजन करून परतणाऱ्या विद्यार्थ्याच्या अपघाती मृत्यू

राज पेडणेकर या शाळकरी विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झालाय

दोन विद्यार्थी गंभीर जखमी

अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको

मुंबई-गोवा महामार्गावर झाराप येथे कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय. या अपघातात शाळकरी मुलगा जागीच ठार झाला. या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग रोखला. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसाल, शाळेत सरस्वती पूजन करून घरी परतणाऱ्या शाळकरी मुलांच्या दुचाकीला कारची धडक बसली. या अपघातात एक मुलगा जागीच ठार झाला. तर अन्य दोघे विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ झाराप फाटा येथे ही घटना घडली. राज पेडणेकर असे मृत मुलाचे नाव आहे. तर त्याच्यासमवेत सोहम परब आणि लवू रविंद्र पेडणेकर हे दोघे जखमी झाले आहेत.

अपघातामधील जखमींना उपचारासाठी सावंतवाडी येथे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग रोखून धरला होता. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली होती. जोपर्यंत कार चालकावर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती. मात्र पोलीसांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्तारोको मागे घेण्यात आला.

मुंबई-गोवा महामार्गावर ट्रेलरचा अपघात

मुंबई-गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या सीमेवर ट्रेलरचा अपघात झालाय. तीव्र उतार आणि वळणावर चालकाचे ट्रेलरवरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर गोव्याहून मुंबईकडे जाणारा ट्रेलर जवळपास शंभर फुट खोल दरीत कोसळला. या भीषण अपघातात ट्रेलरचालक गंभीर जखमी झालाय. या अपघाताच्या ठिकाणी असलेल्या खारेपाटण एसटी बस स्थानकावर एसटी बसची वाट पाहत असलेल्या २० ते २५ महिला सुदैवाने थोडक्यात बचावल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचे मंगळसूत्र मी चोरले; गोपीचंद पडळकरांची जीभ पुन्हा घसरली|VIDEO

Maharashtra Live News Update:पुणे नाशिक महामार्गावरील भिमा नदीच्या पुलावर भिषण अपघात

Mumbai Accident : मुंबई हादरली! आधी महिलेवर अत्याचार केला, नंतर गळा आवळून संपवलं

MHADA Lottery: म्हाडाची ५३५४ घरं आणि ७७ भूखंडांच्या विक्रीसाठी लॉटरी कधी निघणार? वाचा वेळापत्रक

Heart Attack: तरुणांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण का वाढलंय? काय आहेत कारणे?

SCROLL FOR NEXT