Raigad News Saam tv
महाराष्ट्र

Raigad News: शालेय क्रीडा स्पर्धेत स्पर्धकानं फेकलेला भाला डोक्यात घुसला; विद्यार्थ्याचा मृत्यू

Raigad News: रायगडमध्ये शालेय क्रिडा स्पर्धेत स्पर्धकाने फेकलेला भाला लागून विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

Vishal Gangurde

सचिन कदम

Raigad News In Marathi

रायगडमधून धक्कादायक घटना समोर समोर आली आहे. रायगडमध्ये शालेय क्रिडा स्पर्धेत स्पर्धकाने फेकलेला भाला लागून विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रायगड जिल्ह्यातील पुरार येथील शाळेतील घटना आहे. या घटनेने रायगड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील पुरार येथे धक्कादायक घटना घडली आहे. रायगडच्या पुरार येथील शाळेत शालेय क्रिडा स्पर्धेदरम्यान भाला फेकचा खेळ सुरू होता. या खेळादरम्यान स्पर्धकाचा भाला विद्यार्थ्याचा डोक्यात घुसला. यामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रायगड जिल्ह्यातील पुरार येथे घडली.

हुजेफा डावरे असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे. हा विद्यार्थी दहीवली कोंड येथील रहिवासी आहे. माणगाव तालुका माध्यमिक विभागाच्या वतीने या शालेय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

रायगडच्या पुरार येथील शाळेत माणगाव तालुका माध्यमिक विभागाच्या वतीने शालेय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा पाहण्यासाठी हुजेफा डावरे देखील आला होता. हुजेफा प्रेक्षकांच्या रांगेत होता. शाळेत शालेय क्रिडा स्पर्धेत भाला फेकचा खेळ सुरू होता. त्यावेळी एका स्पर्धकाचा भाला प्रेक्षकाच्या दिशेने गेला. स्पर्धकाकडून हा भाला विद्यार्थ्याच्या डोक्यात घुसला.

विद्यार्थ्याच्या डोक्यात भाला घुसल्याने विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत मृत्यू झालेला विद्यार्थी हा दहीवली कोंड येथील रहिवासी आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dark Circles: डार्क सर्कल्समुळे वयस्कर दिसता? लगेचच करा १ घरगुती उपाय

Solapur: सांगा कसं जगायचं? सोयाबीनचं पीक पाण्यात, डोळ्यात अश्रूंचा पूर; दुसरीकडे कर्ज वसुलीसाठी न्यायालयाची नोटीस

Daulatabad Fort History: 'अंधारे’ बोगदे आणि प्रचंड तोफा, दौलताबाद किल्ल्याचा भव्य इतिहास आणि वैशिष्ट्ये

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदे आज घेणार माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांची मॅरेथॉन बैठका

The Bads Of Bollywood: आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'चा दुसरा सीझन कधी येणार? वेब सिरीजमधील अभिनेत्याने केला खुलासा

SCROLL FOR NEXT