Buldhana News संजय जाधव
महाराष्ट्र

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार व हत्याप्रकरणी आरोपींना कडक शासन करा; शिखलकर समाजाची मागणी

संग्रामपूर तालुका शिख शिकलीकर बांधवाचे राष्ट्रपती यांच्याकडे निवेदना द्वारे मागणी...

संजय जाधव

बुलढाणा - तेलंगाणा राज्यातील हैद्राबाद येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी आरोपींवर कार्यवाही करून फाशीची शिक्षा द्यावी, कार्यवाही न झाल्यास तेलंगाणा (Telangana) सरकार व पोलीस (Police) प्रशासन विरोधात महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जिल्ह्यातील शिख शिखलकर समाजाच्या वतीने महामहिम राष्ट्रपती यांना जिखा प्रशासनाद्वारे पाठविण्यात आले आहे.

संग्रामपूर येथे तेलंगणा येथे घडलेल्या बलात्कार हत्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी शिख सिकलकर समाजाने बैठक घेतली व संग्रामपूर तहसिलदार मार्फत संग्रामपूर तालुका शिख शिकलीकर समाज यांच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी या घटनेचा तहसिल कार्यालयासमोर समाजाच्यावतीने तेलगांणा सरकारचा जाहिर निषेध करून त्या सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्यात.

हे देखील पहा -

तेलंगाणा राज्यातील हैद्राबाद रंगारेडडी सुभाषनगर येथील शिख शिकलीकर समाजातील अल्पवयीन मुलगी हिचेवर दिनांक 14 फेब्रवारी 2022 रोजी रात्रीच्या सुमारास गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी अपहरण करून तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार करून तीची अमानुषपणे सुभाषनगर जवळील एका बांधकाम सुरु असलेल्या चार मजली इमारतीवरून फेकुन हत्या केली. हीअत्यंत दुदैवी व अमानवी घटना आहे.

सदर घटनेला आज 5 दिवसाचा कालावधी उलटूनही तेलंगाणा सरकारने व पोलिसांनी कोणतेही कार्यवाही केली नाही. यामधील सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी आणि जलद गती न्यायालयात प्रकरण चालवुन त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी व न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली. अन्यथा समाजाच्या वतीने तेलंगाणा सरकार व पोलीस विरोधात महाराष्ट्रभर आंदोलन छेडल्या जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aamir Khan Marriage : आमिरच्या लग्नाची तारीख ठरली, तिसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात?

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

अचानक धनलाभ होईल, नोकरीत प्रमोशन मिळेल; ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन होणार सुरू

कोकणात ठाकरेसेनेचा उमेदवार फोडला; महाराष्ट्राच्या राजकारणात माघारीचा पॅटर्न, कोणी कुठे घेतली माघार?

लाडकींना सरकारी लाभ सोडवेना; अपात्र लाडकींनी वळवला 'या' योजनांकडे मोर्चा

SCROLL FOR NEXT