Breaking : बीडमध्ये गाजलेल्या मनरेगा घोटाळ्यातील दोषींवर कडक कारवाई होणार विनोद जिरे
महाराष्ट्र

Breaking : बीडमध्ये गाजलेल्या मनरेगा घोटाळ्यातील दोषींवर कडक कारवाई होणार

बीड जिल्ह्यात झालेल्या मनरेगा गैरव्यवहार प्रकरणात दोषींवर कारवाई केली जाईल, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, असा इशारा रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे पाटील यांनी दिला आहे.

विनोद जिरे

बीड - बीड जिल्ह्यात झालेल्या मनरेगा गैरव्यवहार प्रकरणात दोषींवर कारवाई केली जाईल, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, असा इशारा रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे पाटील यांनी दिला आहे. त्यांनी आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत नरेगाच्या कामाचा आढावा घेतला. तसेच, घोटाळ्यासंदर्भात कारवाईच्या सूचना देखील प्रशासनाला दिल्या आहेत. यावेळी पत्रकारांनी बीडचे शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्या गावातील घोटाळ्या संदर्भात प्रश्न विचारला असता.. माझ्याकडे तक्रार आलेली नाही शासन आम्हीच आहोत. दोषी असेल तर कारवाई होणार, मग तो कोणीही असो, असे उत्तर दिले.

हे देखील पहा -

बीड जिल्ह्यात नरेगाच्या कामात मोठा गैरव्यवहार झाल्याचे सांगत जिल्हाधिकारी यांची तडकाफडकी बदली करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिल्यानंतर, आता राज्य सरकारला जाग आली आहे. रोहयो मंत्र्यांनी बीड जिल्हा प्रशासनाची बैठक घेऊन, कामासंदर्भात माहिती घेतली. दोषींवर कारवाई केली जाईल, असं सूचक वक्तव्य केल्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

2011 ते 2019 या आठ नऊ वर्षात बीड जिल्ह्यात रोजगार हमी योजना अर्थात नरेगा अंतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे केल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले आहेत. या संदर्भात मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात, याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना जिल्हाधिकारी न्यायालयाला योग्य माहिती देत नाहीत म्हणून जिल्हाधिकार्‍यांच्या बदलीचे आदेश देण्यात आले होते.

यानंतर बीड जिल्ह्यात नरेगा घोटाळा हा विषय चर्चेला आला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारला जाग आली असून रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांनी आज बीड जिल्हा दौऱ्यावर येत रोहयोच्या कामाची पाहणी करत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक घेतली आहे. या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी यांना कारवाईच्या अनुषंगाने सूचना दिल्या. तसेच नरेगाच्या रखडलेल्या कामासंदर्भात व शेतकऱ्यांच्या थकित बिलासंदर्भात देखील जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Parenting Tips : मुलांना ओरडल्यानंतर पालकांनी चुकूनही करू नका 'ही' चूक, विश्वासाचं नातं एका क्षणात तुटेल

Pune : पुण्यात पोलिसांनीच केले पोलिसांचे 'स्टिंग ऑपरेशन'! डमी डिलिव्हरी बॉय बनवून केला मोठा पर्दाफाश

Actor Home Fraud: मराठमोळ्या अभिनेत्याची २५ लाखांची फसवणूक; न्यायासाठी वर्षभरापासून करतोय धावपळ

Shocking : पनवेल हादरलं! तरुणाने अल्पवयीन मुलीला सार्वजनिक शौचालयात नेले, लैंगिक अत्याचार केले अन्...

SCROLL FOR NEXT