Palghar Accident saam tv
महाराष्ट्र

Palghar Accident: पालघरमध्ये विचित्र अपघात; एका महिलेचा मृत्यू तर, 4 जण जखमी

Rickshaw and Jeep Accident at Palghar : पालघर मनोर रस्त्यावर शेलवली गाव हद्दीत रेमी कंपनीसमोर झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. सायंकाळी रिक्षाने घरी परतताना हा अपघात घडला.

Dhanshri Shintre

रूपेश साम टीव्ही न्यूज

पालघर मनोर रस्त्यावर शेलवली गाव हद्दीत रेमी कंपनीसमोर झालेल्या विचित्र अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला झाला असून चार जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. कामावरून रिक्षाने घरी परतत असताना सायंकाळी ही गंभीर घटना घडली आहे. या अपघातात उज्वला रमेश जाधव (रा. देवकोप, तांडेलपाडा) हिचा मृत्यू झाला. बुलेट ट्रेन प्रकल्पसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनाकडून हा अपघात झाला असून वाहचालक फरार आहे.

कामावरून रिक्षाने घरी जात असताना हा अपघात घडला. रिक्षा चालक चंद्रकांत म्हात्रे हा रामभाऊ सापटे (शेलवली दस्तुरपाडा), उज्वला उमेश जाधव (देवकोप तांडेलपाडा), सुनीता वाढान देवकू पाटील पाडा व इतर यांना देवकोप येथे घेऊन जात होता. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या जीजे ०८ सी ६९०९ ही भरधाव बोलेरो जीप मनोरकडून पालघरकडे येत असताना तिने पालघर वाहिनी सोडून मनोर वहिनीकडे जात असलेल्या या रिक्षासह मोटारसायकलला जोरदार धडक दिली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

या अपघातात रिक्षा व मोटरसायकल तसेच बलेरो जीप चक्काचूर झाली. अपघात घडल्यानंतर जखमी रामभाऊ सापटे, उज्वला जाधव, रिक्षा चालक चंद्रकांत म्हात्रे यांना स्थानिकांनी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सुनीता वाढण व बाईक स्वार समीर लढे यांना पालघरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर उज्वला उमेश जाधव यांना तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर रामभाऊ सापटे गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी वलसाड येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. बोलेरो जीप चालक फरार असून याप्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन पुढील प्रक्रिया सुरू केली आहे. मृत्यू झालेल्या उज्वला जाधव या परिचारिका असून बोईसर येथील एका रुग्णालयात त्या काम करत होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! सिमेंट मिक्सरने दोघांना चिरडलं, वडिलांच्या डोळ्यासमोर ८ वर्षीय अहानाने सोडले प्राण

Dagdusheth Halwai Ganpati: पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट’ला 'अ' वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा

Diesel Crisis: परभणीत डिझेलची टंचाई, पेट्रोल पंपाबाहेर कॅन घेऊन रांगा; पाहा VIDEO

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येसाठी ५५८ कोटींचं बक्षीस, जागतिक राजकारणात मोठी खळबळ

IPL 2026: RCBlचं प्लेऑफमधील तिकीट कन्फर्म; पंजाबच्या पराभवानंतर २ संघांची 'चांदी', कसे असणार स्पर्धेचं समीकरण?

SCROLL FOR NEXT