Khed Firing update Saam tv
महाराष्ट्र

Khed Firing : कोकण हादरलं! मुंबई-गोवा महामार्गावर गोळीबार; आधी पाठलाग केला अन्

Khed Firing update : मुंबई-गोवा महामार्गावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. दुचाकीवरील दोघांनी पाठलाग करून कारवर दगडफेक केली.त्यानंतर हवेत गोळीबार केला.

अमोल कलये

Khed Firing News : रत्नागिरीच्या खेड तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर वेरळ येथील खोपी फाटा परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. दोन अज्ञात तरुणांनी दुचाकीवरून पाठलाग करत एका कार थांबवली. या दोघांनी कारवर दगडफेक करून काचा फोडल्या. त्यानंतर एका तरुणाने थेट रिवॉल्वर बाहेर काढून हवेत गोळीबार केला. या घटनेमुळे प्रचंड घबराट आणि भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

कोकणात दिवसाढवळ्या अशा पद्धतीने खुलेआम फायरिंग होण्याची ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे. दोघांनी कारसमोर त्यांची दुचाकी आडवी लावली. त्यानंतर कारवर दगडफेक केली. त्यानंतर दोघांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पुढे दुचाकीवरील एका तरुणाने रिवॉल्वर काढून हवेत गोळी झाडली. संपूर्ण प्रकार काही सेकंदात घडल्याने कारमधील व्यक्ती घाबरून गेली. या घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.

गोळीबाराच्या या घटनेनंतर खेड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांनी तातडीने पंचनामा सुरू केला. गोळीबार केलेल्या रिवॉल्वरची पुंगळी घटनास्थळी शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरु आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. गोळीबाराच्या या घटनेनंतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपासाचे चक्र फिरवण्यात आले आहे.

स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण आहे. पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या गोळीबाराच्या घटनेने कोकणात गुन्हेगारीचे सावट पसरू लागल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Politics: आणखी एका पक्षात फूट; 12 आमदारांपैकी 8 आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश, राजकीय वर्तुळात खळबळ

SRA कार्यालयात ऑनलाइन प्रवेशाचा खोळंबा; ओटीपीसाठी नागरिकांची प्रतीक्षा

Maharashtra News Live Update: भारत सोडण्याच्या नोटीस विरोधात इम्रान खानची मुंबई उच्च न्यायालयात धाव

Chanakya Niti : या ३ गोष्टींवर पैसा खर्च करताना कंजूषी करू नका, अन्यथा होईल मोठं नुकसान

Post Office Scheme: मुलीच्या भविष्यासाठी बेस्ट योजना! पोस्ट ऑफिसच्या या स्कीममधून मिळू शकतात लाखो रुपये

SCROLL FOR NEXT