Women Drivers in ST Bus Saam TV
महाराष्ट्र

एसटीचे स्टेअरिंग आता महिलांच्या हाती; 41 महिला चालकांचे प्रशिक्षण सुरू

41 महिला चालकांची नियुक्ती झाली आहे. त्यांना 3 हजार किलोमीटर एसटी चालविण्याचं प्रशिक्षण पूर्ण करायचं आहे.

संजय डाफ

नागपूर: नागपुरात एसटी चं स्टेअरिंग लवकरच महिला चालकांच्या हाती येणार आहे. यासाठी नागपूर विभागात 41 महिला चालक प्रशिक्षण घेत आहे. लवकरच या महिला कर्तव्यावर रुजू होतील. वाहकांनंतर आता चालकाच्या भूमिकेत महिला दिसणार आहे. विलनिकरणाच्या मागणीसाठी गेल्या अडीच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा (ST Employees) संप सुरू आहे. त्यामुळं एसटी महामंडळ तोट्यात गेलं आहे. या तोट्यातून बाहेर काढण्यासाठी महामंडळ प्रयत्न करत आहे. खाजगी चालकांच्या माध्यमातून एसटी च्या फेऱ्या सुरू आहेत. त्यातीलच एक भाग म्हणून आता महिला चालकांना हाती एसटी चे स्टेअरिंग दिलं जाणार आहे. 41 महिला चालकांची नियुक्ती झाली आहे. त्यांना 3 हजार किलोमीटर एसटी चालविण्याचं प्रशिक्षण पूर्ण करायचं आहे. लवकरच त्या कर्तव्यावर रुजू होणार आहे. (Women Drivers in ST Bus; 41 women empolyees under taining)

सध्या महिला वाहकांची भूमिका पार पाडता आहेत. मात्र, हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्या चालकांच्या भूमिकेतही दिसतील. महिला चालकांमुळं एसटी पूर्वीसारखचं रुळावर येईल, अशी अपेक्षा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. सरकारमध्ये विलिनीकरण करा अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना पगार वाढ दिलेली आहे. त्यानंतर अनेक कर्मचारी कामावर रुजू देखील झाले आहेत. परंतु काही कर्मचारी विलिनीकरणाच्या मुद्यावर ठाम आहेत. त्यांच्याकडे आता सरकारने आणि महामंडळाने दुर्लक्ष करुन पर्यायी व्यवस्था उभी करायला सुरुवात केली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : नांदेड जिल्ह्यात नऊ विधानसभेसह लोकसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT