तुकाराम मुंढे येणार अडचणीत; नागपूर महापालिकेतील स्टेशनरी घोटाळा  Saam Tv
महाराष्ट्र

तुकाराम मुंढे येणार अडचणीत; नागपूर महापालिकेतील स्टेशनरी घोटाळा

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : सध्या नागपूर महापालिकेतील स्टेशनरी घोटाळा गाजत आहे. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या काळातील हा घोटाळा आहे. त्यामुळे या प्रकरणी तुकाराम मुंढे अडचणीत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भाजपने (BJP) मुंढे यांच्या चौकशीची मागणी केली आहे. कोरोना (Corona) काळात प्रशासन व्यस्त असताना नागपूर (Nagpur) महानगर पालिकेतील (Municipal Corporation) काही कर्मचारी आणि कंत्राटदार घोटाळा करण्यात व्यस्त होते.

हे देखील पहा-

कोरोना काळात राज्य सरकारकडून 50 कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. यातील काही निधीतून स्टेशनरी खरेदी करण्यात आली. यामध्ये मोठा भ्रष्टाचार करण्यात आला. महापालिकेला स्टेशनरी पुरविणाऱ्या कंपनीने (company) बनावट सह्या करून 67 लाखांचा घोटाळा केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात 4 लोकांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी एक समिती तयार केली आहे.

1 एप्रिल 2020 ते आता पर्यंत मनपा मधून कॉन्ट्रॅक्टरला (contractor) केलेल्या पेमेंटची तपासणी केली जाणार आहे. सत्तापक्ष असलेल्या भाजपने सुद्धा चौकशीसाठी उपसमिती तयार केली आहे. मात्र, ज्या काळात हा घोटाळा झाला त्या काळात तुकाराम मुंढे हे आयुक्त होते. त्यामुळे त्यांच्यावर आरोप होऊ लागले आहेत. मुंढे यांनी महापालिकेत एकछत्री कारभार होता. त्यांच्या परवानगी शिवाय कुठलेही काम होत नव्हते.

त्यामुळे त्यांचा या प्रकरणात सहभाग तर नाही ना अशी शंका उपस्थित करत चौकशीची मागणी भाजपने केली आहे. तुकाराम मुंढे आयुक्त असताना त्यांच्यात आणि सत्तापक्ष असलेल्या भाजप मध्ये संघर्ष बघायला मिळाला होता. त्यावेळी मुंढे यांनी भाजपची चांगलीच कोंडी केली होती. आता भाजपला संधी मिळाली आहे. त्यामुळे तुकाराम मुंढे यांच्या चौकशीची मागणी करून त्यांना कोंडीत पकडण्याची खेळी भाजपने खेळली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maggi Dosa Recipe : मुलांना टिफीनमध्ये द्या झटपट बनवलेला मॅगी डोसा; वाचा 5 मिनिटांत तयार होणारी रेसिपी

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान मोदींचा आज वर्धा दौरा; असा असेल कार्यक्रम...

Palghar Crime: निर्मात्याकडून अश्लील मेसेज अन् छेडछाड; २६ वर्षीय अभिनेत्रीची पोलिसात तक्रार, मुंबईमधील धक्कादायक प्रकार

Bigg Boss Marathi : संग्रामला टोला, अरबाजचं तोंडभरून कौतुक; उत्कर्ष शिंदे काय म्हणाला ?

Western Railway Jobs : पश्चिम रेल्वेत सर्वात मोठी भरती, तब्बल ५०६६ जागा भरणार, पगार किती ? तुम्ही पात्र आहात का? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT