Free Sand, Home Construction, Housing Scheme 
महाराष्ट्र

Free Sand : खूशखबर! घरकुलांसाठी पाच ब्रास वाळू मोफत मिळणार, महसूलमंत्र्यांची घोषणा

Free Sand, Home Construction, Housing Scheme : घरकुलांसाठी मोफत वाळू देण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला आहे. महसूलमंत्री बावनकुळेंनी याबाबत माहिती दिली आहे. लवकरच वाळूधोरण मंत्रीमंडळ बैठकीत मांडले जाणार आहे.

Namdeo Kumbhar

Free Sand, Home Construction, Housing Scheme : घरकुल बांधणाऱ्या लाखो गरजूंना राज्य सरकारने खूशखबर दिली आहे. घरकुल बांधणाऱ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला आहे. या निर्णयाची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. लवकरच वाळूधोरण मंत्रीमंडळ बैठकीत मांडले जाणार आहे. नागपुरात शनिवारी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, या निर्णयाचा फायदा घरकुल बांधत असलेल्या लाखो लोकांना होणार आहे.

वाळू धोरण आठवडाभरात येणार -

राज्य सरकार या आठवड्यात सर्वसमावेशक वाळू धोरण मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार असून याबाबत अनेक सूचना जनतेकडून आल्या आहेत. त्यांचा समावेश यामध्ये केला असून अधिकाऱ्यांच्या आजवर आठ बैठका याबाबत घेण्यात आल्या आहेत, असे बावनकुळे यांनी सांगितले. राज्यात ज्या ठिकाणी वाळू घाटांचे लिलाव झाले नाहीत. ज्या ठिकाणी पर्यावरण विभागाची मंजुरी मिळाली आहे, अशा ठिकाणी घाट सुरू करण्याचा निर्णय हे नवीन वाळू धोरण मंजूर झाल्यानंतर घेतला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

राज्यात एम-सॅन्ड योजना

राज्य सरकार लवकरच एम-सॅन्ड ही योजना आणणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्टोन क्रशरच्या माध्यमातून दगड बारीक करून ही वाळू तयार केली जाईल. त्यामुळे पर्यायी वाळूच्या उपलब्धतेमुळे पारंपरिक नदीतील वाळूची मागणी कमी होईल,असा दावा बावनकुळे यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Railway Accident : नाशिकमध्ये मोठी दुर्घटना, धावत्या एक्सप्रेसमधून ३ जण पडले, दोघांचा मृत्यू, एक गंभीर

Surya gochar: दिवाळीपूर्वी सूर्य-मंगळाने बनवला खास राजयोग; 'या' राशींच्या घरी येईल लक्ष्मी, घराची भरभराटही होईल

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Maharashtra Rain Alert : दिवाळीवर पावसाचे सावट, पुढील काही दिवस राज्यात कोसळधारा, 'या' जिल्ह्यांना IMD नं दिला इशारा

Gulab Jamun Recipe : सणासुदीला खास बनवा रताळ्याचे गुलाबजाम, १० मिनिटांत खाण्यासाठी तयार

SCROLL FOR NEXT