Pandharpur Temple News Saam TV
महाराष्ट्र

Pandharpur Temple News : विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा कायापालट होणार; मंदिर विकास आराखड्याला अंतिम मंजुरी

Pandharpur Temple News : मंदिराला मूळ रूप प्राप्त व्हावे यासाठी मंदिर समितीने राज्य सरकारला विकास आराखडा सादर केला होता.

भारत नागणे

Pandharpur News : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर विकास आराखड्याला राज्य शासनाने तत्वतः मंजुरी दिली आहे.

मंदिर विकास आराखड्याच्या कामाचा शुभारंभ येत्या आषाढी एकादशीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

काल मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य शिखर समितीच्या बैठकीमध्ये मंदिर विकास आराखड्याला अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये 73 कोटी 80 लाख रुपये खर्च करून मंदिराचे मूळ स्वरूप जतन करण्यात येणार आहे. (Latest News Update)

विठ्ठल रुख्मिणी मंदिराला मूळ रूप प्राप्त व्हावे यासाठी मंदिर समितीने राज्य सरकारला विकास आराखडा सादर केला होता. त्या विकास आराखड्याला आता राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. यामुळे सातशे वर्षांपूर्वीचे विठ्ठल मंदिर आता भाविकांना मूळ स्वरूपात पाहायला मिळणार आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahilyanagar Fort : अभेद्य तटबंदी अन् गौरवशाली इतिहास, स्वातंत्र्यलढ्याची आठवण जपतोय 'हा' किल्ला

Famous Actress : स्टेज ४ कॅन्सरशी झुंज सुरू, किमोथेरपीने होतोय भयंकर त्रास; तरीही प्रसिद्ध अभिनेत्री करतेय चित्रपटाचे शूटिंग

नाश्त्यासाठी बनवा स्वादिष्ट पालक पनीर पराठा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: भंडाऱ्यात बीटीबी भाजी मार्केटच्या व्यापाऱ्यांना जिल्हा न्यायालयाचा मोठा दिलासा

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेंचा दिग्गज नेता आणि नगरसेवकाविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT